Wind Chime Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Wind Chime Vastu Tips : घरातील 'विंड चाइम' उघडेल नशिबाचे दार, योग्य दिशेला लावल्यास लवकरच मिळेल आनंदाची बातमी

Vastu Tips : विंड चाइम हा वास्तुशास्त्र व फेंगशुई दोन्हीमध्ये अधिक महत्त्वाचे ठरते पण हे घेण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

Wind Chime Placing Tips : वास्तुशास्त्रानुसार घरातील अशा अनेक गोष्टी आहे ज्यामुळे आपले नशिब चमकते. विंड चाइमला फेंगशुई असे म्हटले जाते. हे मुळात चिनी वास्तुशास्त्र आहे. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व दिले जाते. आपल्यापैकी बरेचजण वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू खरेदी करतात.

विंड चाइम हा वास्तुशास्त्र व फेंगशुई दोन्हीमध्ये अधिक महत्त्वाचे ठरते पण हे घेण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची व त्याची दिशा योग्य असेल तर आपल्याला त्याचा फायदा होतो. परंतु, वास्तुनुसार अनेक वस्तू घरात आणल्याने किंवा लावल्याने आनंदाचा मार्ग खुला होण्यास मदत होते. तर आपण वास्तुशास्त्राच्या (Vastu) नियमांकडे लक्ष दिले नाही तर आपले नुकसान होते.

विंड चाइम खरेदी (Buying) करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. दिशा, विंड चाइमचा आवाज यासोबतच त्याच्या धातूचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. योग्य आवाज, धातू आणि आकाराचे विंड चाइम घरात सकारात्मकता आणि आनंदाची बातमी आणते. चला जाणून घेऊया विंड चाइम्सशी संबंधित वास्तु टिप्स.

1. दिशा (direction)

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरामध्ये कोणत्याही धातूचा विंड चाइम लावत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की ते तुमच्या घराच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावावे. दुसरीकडे, जर तुम्ही घरात लाकडाचा विंड चाइम लावत असाल तर ते नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवा. घरामध्ये कुठेही विंड चाइम लावल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करु शकते. त्यामुळे घरात अशांतता येते. म्हणूनच विंड चाइम लावताना दिशा लक्षात ठेवा.

2. या गोष्टी टाळा

घरामध्ये विंड चाइम नेहमी अशा ठिकाणी लावा की जिथे हवेचा प्रवाह असेल. खिडकीवर किंवा मुख्य दरवाजावर लावयला हवे. स्वयंपाकघरात विंड चाइम लावणे टाळा. स्वयंपाकघर हे ऊर्जेचे स्त्रोत मानले जाते, येथे विंड चाइम लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Transport News : एक कार्ड, अनेक सुविधा! प्रवाशांचा वेळ वाचणार, ‘वन पुणे कार्ड’वर मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास

Donald Trump Protest: डोनाल्ड ट्रम्पविरोधात जनतेचा संताप! अमेरिकेत ‘नो किंग्ज’ आंदोलनाचा भडका|VIDEO

Sanjay Raut : संजय राऊतांनी राजीनामा द्यावा अन् पालिका निवडणूक लढवावी, शिंदेंच्या आमदाराचं आव्हान

Weekly Horoscope: 'या' राशींनी महत्त्वाचे निर्णय घाईत घेणं टाळावं; साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT