Kokum avoid vegetables: कोणत्या भाज्यांमध्ये कोकमाचा वापर करू नये?

Surabhi Jayashree Jagdish

कोकम

कोकम हा आंबटपणासाठी आणि पचनासाठी उपयुक्त मानला जातो. पण तो प्रत्येक भाजीमध्ये वापरणं योग्य नसतं. काही भाज्यांची नैसर्गिक चव, पचनगुण कोकमामुळे बिघडू शकतात.

स्वयंपाक

अशा काही भाज्या आहेत ज्यामध्ये कोकमाचा वापर करू नये. पाहूयात तुम्ही स्वयंपाक करताना कोणच्या भाज्यांमध्ये कोकम वापरू नये.

कोबीची भाजी

कोबी आधीच थोडी आंबूस आणि गॅस निर्माण करणारी भाजी आहे. त्यात कोकम घातल्यास पोटफुगी आणि आम्लपित्त वाढू शकतं. भाजीची चवही कडवटसर होण्याची शक्यता असते.

बटाट्याची भाजी

बटाटा गोडसर आणि मऊ चवीचा असतो.कोकम घातल्याने त्याची मूळ चव दबली जाते. भाजी बेचव लागू शकते.

दोडका, घोसाळी, दुधी भोपळा

या भाज्या सौम्य आणि गोड चवीच्या असतात. कोकम घातल्यास चव बिघडू होते. यामुळे भाजीची नैसर्गिक चव निघून जातो.

वाटाण्याची भाजी

वाटाणे गोडसर आणि प्रथिनयुक्त असतात. कोकमामुळे त्यांचा स्वाद बिघडतो. भाजीला नकोसा आंबटपणा येतो.

पालेभाज्या

पालेभाज्या आधीच थोड्या कडू किंवा तुरट असतात. कोकम घातल्यास कडूपणा वाढू शकतो. पचनाच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते.

Borivali Tourism: थंडीच्या दिवसात बाहेर भटकायला जायचंय? लांब न जाता बोरिवलीच्या या ठिकाणी फिरून या

येथे क्लिक करा