Vastu Tips 
लाईफस्टाईल

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार बेडरुममध्ये या गोष्टी ठेवूच नका! सतत सापडाल आर्थिक संकटात...

Vastu Tips For Home : वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. घरामध्ये सर्वकाही सुरळीत असताना देखील सतत पैशांची चणचण भासणे, वाईट घडणे यांसारख्या गोष्टींना कुठे तरी वास्तूदोषाचा समावेश असतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Bedroom :

वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. घरामध्ये सर्वकाही सुरळीत असताना देखील सतत पैशांची चणचण भासणे, वाईट घडणे यांसारख्या गोष्टींना कुठे तरी वास्तूदोषाचा समावेश असतो.

आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची जागा बेडरुम. बेडरुमची जागा योग्य नसेल तर आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात दूरावा येतो. वास्तूदोष निर्माण झाल्यामुळे मन देखील अशांत राहाते. जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की, झोपताना या गोष्टी पलंगाच्या जवळ ठेवल्याने नकारात्मकता वाढते. जाणून घेऊया बेडरुममध्ये या गोष्टी ठेवू नका. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • वास्तूशास्त्रानुसार (Vastu tips) शूज आणि चप्पल पलंगाखाली ठेवू नये. यामुळे नकारात्मकता वाढते.

  • पलंगाखाली लोखंडी, प्लास्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवणे टाळावे. यामुळे घरात (Home) वास्तूदोष निर्माण होतो.

  • वास्तूशास्त्रानुसार पलंगाखाली झाडू ठेवू नये. यामुळे घरातील व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जीवनात आर्थिक (Money) समस्यांना समोरे जावे लागते.

  • पलंगाखाली सोने किंवा चांदी ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात सतत भांडणे होतात.

  • बेडजवळ झोपताना पाण्याची बाटली ठेवू नका. ज्यामुळे कुंडलीतील चंद्र कमजोर होतो. त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

  • झोपताना न धुतलेले घाणेरडे कपडे बेडजवळ ठेवू नयेत. वास्तूशास्त्रानुसार यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.

  • लोक झोपताना अनेकदा बेडजवळ चप्पल काढतात, वास्तुनुसार असे करणे टाळावे. -

  • अनेक वेळा चहा, कॉफी किंवा दूध प्यायल्यानंतर लोक कप किंवा ग्लास रात्रभर बेडसाइडच्या टेबलवर ठेवतात. वास्तूनुसार, न धुतलेली भांडी पलंगाच्या जवळ ठेवणे टाळावे. यामुळे झोपेत भयानक स्वप्ने पडतात.

  • वास्तूनुसार झोपताना उशीजवळ पुस्तक ठेवू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनातील प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पदावरून दिलीप नाईक यांचा राजीनामा

Avdhut Sathe: ट्रेड गुरु अवधूत साठेंवर SEBIची मोठी कारवाई! ५४६.२ कोटी वसूलीचे आदेश

घरी कुणीही नव्हतं; नराधम आजोबाची नियत फिरली, नातीसोबत केलं असं काही की.., महाराष्ट्र हादरलं

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'च्या विजेत्याला ट्रॉफीसह किती रक्कम मिळणार? टॉप ३ मध्ये 'या' नावांची चर्चा

IND vs SA: तिसऱ्या वनडेसाठी भारताच्या प्लेईंग ११ मध्ये होणार मोठा बदल, 'या' खेळाडूला दाखवणार बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT