Vastu Tips 2023 : नवीन वर्षाची चाहूल प्रत्येकालाच लागली आहे. २०२२ चा हा शेवटचा महिना असल्यामुळे प्रत्येकाला येणाऱ्या नवीन वर्षात काही तरी नवीन करण्याची इच्छा असेल. काहींनी प्लान रेडी केला असेल तर काही अजूनही संभ्रमात असतील.
प्रत्येकाला येणारे नववर्ष हे सुख-समृध्दीचे जावो ही प्रत्येकाची अपेक्षा असते. मागील काही काळात पैशांची तंगी व घरातील सुख-समृध्दी हरवल्यासारखे प्रत्येकाला वाटत असेल. वास्त्रुशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहे ज्याचे पालन केल्यास कधीच धनासंबंधित अडचणी निर्माण होणार नाही. तसेच प्रत्येक क्षेत्रात यश देखील मिळेल.
वास्तुशास्त्रानुसार मां लक्ष्मीसोबत सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रवेश मुख्य दरवाजातून होतो. म्हणूनच मुख्य दरवाजामध्ये अशा वस्तू ठेवा, ज्यामुळे शुभ परिणाम मिळतील.
नवीन वर्षात मुख्य दरवाजात या गोष्टी लावा
1. घोड्याचा नाळ
वास्तुशास्त्रात घोड्याच्या नाळीचे खूप महत्त्व आहे. हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मुख्य दरवाजात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आत येत नाही. यासोबतच सुख-समृद्धी प्राप्त होते.
2. दारात धार्मिक चिन्हे बनवा
वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजामध्ये स्वस्तिक, ओम, क्रॉस इत्यादी चिन्हे बनवता येतील किंवा कृत्रिम सुद्धा बसवता येतात. हे देखील प्रवेशद्वारावर लावल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.
3. गणपतीची मूर्ती
घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मुख्य दारात गणेशाचे (Ganesh) चित्र किंवा मूर्ती अवश्य लावा. घराच्या मुख्य दरवाजाच्या आत ठेवा. बाहेरच्या बाजूला गणपतीचे चित्र लावल्याने पैशाची (Money) कमतरता भासते.
4. तांब्याचा सूर्य
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावणे शुभ मानले जाते. सूर्याचे प्रतीक घरात ठेवल्याने सुख-समृद्धी येते. यासोबतच कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते. म्हणूनच नवीन वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी मुख्य दरवाजावर तांब्यापासून बनवलेला सूर्य अवश्य लावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.