घरामध्ये काम करताना आपल्या हातून अनेक गोष्टी खाली पडतात. जेवण बनवताना काही पदार्थ देखील खाली सांडतात. जेवण किंला धान्य खाली सांडणे अशुभ मानले जाते. अशात जेवण बनवत असताना तुमच्या हातून कधी तेल सांडलं आहे का? तेल सांडणे ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्याबाबतच आज सविस्तर माहिती जाणून घेऊ.
भारतीय संस्कृतीमध्ये तेलाशिवाय कोणतेही शुभ कार्य पार पडत नाही. शनीदेवाला देखील तेल वाहिले जाते. त्यामुळे जेव्हा तेल सांडते तेव्हा शनी देवता आपल्यावर प्रसन्न नसल्याचे संकेत मानले जातात. तेल जेवणापासून ते लहान मुलांच्या मालीशपर्यंत सर्वच कामासाठी वापरलं जातं. त्यामुळे तेल सांडल्यानंतर पुढील समस्या उद्भवातत.
आर्थिक चणचण
तेल खरंतरं महाग असतं. त्यामुळे तेल वापरताना ते फार जपून वापरलं पाहिजे. चुकून हातून तेल सांडलं तर अचानक काहीतरी आर्थिक अडचणी समोर येतात. या अडचणींपासून सावरण्यासाठी अशा घटना घडल्यानंतर आपण स्वत:च आधीच सावध झालं पाहिजे.
हातातलं काम पूर्ण होत नाही
तेल सांडल्यानंतर जर तुम्ही काही महत्वाचं काम हाती घेतलं असेल तर ते पूर्ण होत नाही, असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे. तेल सांडल्याने नोकरीच्या ठिकाणी देखील अडचणी निर्माण होण्यास सुरूवात होते.
प्रत्येक धर्मात विविध रुढी आणि परंपरा असतात. काही ठिकाणी तेल सांडणे अशुभ माणतात तर काही ठिकाणी तेल सांडणे शुभ मानतात. तेल सांडल्यामुळे आपल्यावर येणारं संकट आपल्यापर्यंत पोहचण्याआधीच टळलं गेलं असं म्हटलं जातं. तेल सांडल्यावर शनी देवतेची पुजा करावी असाही सल्ला काही ठिकाणी दिला जातो.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.