Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केस धुतल्यानंतर टॉवेलचा वापर करताय ? होईल मोठे नुकसान, वेळीच थांबा!

आंघोळ करताना आणि त्यानंतर आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे खूप नुकसान होऊ शकते.

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : आरोग्य जपण्यासाठी आजकाल प्रत्येक जण खूप मेहनत घेताना पाहायला मिळतं. सकाळी लवकर आंघोळ करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आंघोळ केल्यावर फ्रेश वाटते. आंघोळ केल्यावर कोणतेही काम करण्याकडे कल अधिक असतो पण, आंघोळ करताना आणि त्यानंतर आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे खूप नुकसान होऊ शकते.

केसांचे (Hair) आरोग्य जपण्यासाठी आपण हेअर स्पा, हेअर मास्क, ऑयलिंग यासाठी अनेक जण महागडे प्रोडक्ट्स वापरताना पाहायला मिळतात. मात्र केसांची काळजी घेताना काही मूळ गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. केसांची काळजी घ्यायची असेल तर, केस धुणे आणि केस सुकवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. अनेक जण केस धुतल्यानंतर केसांना लगेचच टॉवेल गुंडाळून ठेवतात, यामुळे केस सुकतात आणि केसांमधील पाणीही अंगावर गळत नाही. पण ही सवय खूप नुकसानदायक आहे, चला तर मग पाहूयात.

१. केस कोरडे होतात -

आंघोळीनंतर डोक्यावर टॉवेल गुंडाळल्याने केस टॉवेलसोबत घासले जातात. यामुळे केस रुक्ष किंवा कोरडे होऊ शकतात. कारण जास्त वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस खूप कोरडे होतात.

२. केस तुटणे -

केसांवर टॉवेल फिरवल्याने कमकुवत केस ओढल्यामुळे ते तुटू शकतात. अशा परिस्थितीत अनेक केस मुळापासून तुटतात, तर अनेक निरोगी केसही टॉवेलच्या धाग्यात अडकतात आणि अर्धे तुटतात.

३. केस गळती -

आंघोळीनंतर ओल्या केसांना टॉवेल गुंडाळल्याने केस खराब होतात. यामुळे केस कमकुवत होऊन केस गळती होते. केस ओले असताना फार नाजूक असतात. अशावेळी केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांचे टॉवेलसोबत घर्षण होतं. यामुळे केस तुटतात, त्याशिवाय यामुळे केसांची चमकही कमी होते.

४. चेहऱ्यावर टॉवेल लावू नका -

केवळ केसांवरच नाही तर चेहऱ्यावरही टॉवेल घासणे योग्य नाही. चेहऱ्यावर टॉवेल घासल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आंघोळीनंतर टॉवेल चेहऱ्यावर न घासण्याचा प्रयत्न करा. त्यापेक्षा त्वचेवर हलक्या हाताने थापून पाणी (Water) कोरडे होऊ द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT