आजकाल इयर बड्लचा वापर आपण सर्वजण करतो. यामध्ये नॉइज कॅन्सलेशन हे एक नवं फीचर आहे. या फीचरचा अनेकांना फायदा होता. मात्र या नॉइज कॅन्सलेशन इयरबड्सचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे एका व्यक्तीच्या कानाच्या पडद्याला (ईयरड्रम) छेद पडल्याची घटना समोर आली आहे.
सोशल मीडियावर ही बातमी पसरताच अनेक युजर्स आता सतर्क होत आहेत. @_kumbhkaran नावाच्या युजरने एक्सवर त्याचा अनुभव शेअर केला. या व्यक्तीने दोन वर्षे 50 डेसिबलपर्यंतचा आवाज कमी करणारे नॉइज कॅन्सलेशन इयरबड्स वापरले होते. शेवटच्या काही महिन्यांत तो दररोज 3-4 तास याचा वापर करत होता.
एक दिवस अचानक त्याला कानात तीव्र वेदना झाली. डॉक्टरांकडे गेल्यावर तपासणीत ईयरड्रममध्ये छेद असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी औषध दिले आणि पाच दिवसांनी पुन्हा तपासणीस बोलावलं.
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक युजर्स काहीसे चिंतेत आहे. संबंधित व्यक्तीने लिहिलंय की, हे इयरबड्स वापरण्यास आकर्षक वाटतात, पण त्यामागे मोठा धोका आहे. यावेळी सर्वांना सावध राहण्याचा सल्ला दिला.
काही युजर्सने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, ते नियमित इयरफोन वापरतात आणि ही माहिती वाचून त्यांना भीती वाटू लागली आहे. एका युजरने लिहिलंय की, रोज इयरबड्स वापरतो, पण त्याचा कानावर किती परिणाम होतो हे लक्षात घेत नाही. नॉइज कॅन्सलेशन जरी सोयीचं वाटत असलं तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होत असेल तर तो उपयोगी नाही.
नॉइज कॅन्सलेशन हे कसं काम करतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अॅक्टिव नॉइज कॅन्सिलेशन हे बाहेरील आवाज कमी करण्यासाठी त्याच्या उलट ध्वनी उत्पन्न करतं. यामुळे युझर्स कमी वॉल्यूमवर गाणी किंवा कॉल ऐकू शकतात. मात्र, दीर्घकाळ वापरल्यास कानावर दबाव निर्माण होतो. तीव्र आवाज किंवा दबावामुळे कानाच्या पडद्याला नुकसान होऊ शकतं. या प्रकरणात वॉल्यूम फारसा जास्त नव्हता.
अॅक्टिव नॉइज कॅन्सलेशन इयरबड्स वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सतत काही तास वापरण्याऐवजी मधूनमधून ब्रेक घ्यावा. जास्त आवाजाची गरज नसल्याने आवाज कमी ठेवावा. इयरबड्स स्वच्छ ठेवावेत कारण अस्वच्छतेमुळे इन्फेक्शन होऊ शकतं. इयरबड्सची फिटिंग कानाच्या आकारानुसार योग्य असावी, जेणेकरून अतिरिक्त दबाव टाळता येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.