Budhwar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Wednesday Puja Tips: बुधवारी गणपतीच्या पुजेमध्ये वापरा 'या' 5 गोष्टी; गणपती बाप्पाचा सदैव राहील आशीर्वाद

Ganesh Puja Upay: बुधवारी गणपतीची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांपासून त्रस्त असाल, तर बुधवारी गणपतीची पूजा करताना काही विशिष्ट गोष्टींचा वापर करा.

Surabhi Jayashree Jagdish

  • गणेशाची पूजा बुधवारी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

  • शमीपत्र अर्पण केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात.

  • दूर्वा अर्पण करणे गणेश आणि बुधदेव यांच्या कृपेसाठी फायदेशीर आहे.

हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीगणेश यांना प्रथम पूजनीय मानलं जातं. विघ्नहर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतींची भक्तिभावाने पूजा केली की, जीवनातील अडथळे दूर होतात आणि अडकलेली कामं यशस्वी होऊ लागतात.

श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी बुधवार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असं मानलं जातं की, या दिवशी गणेशाची शास्त्रशुद्ध पूजा केल्यास त्यांची कृपा लवकरच लाभते. आता बघूया बुधवारच्या दिवशी कोणते उपाय केल्यास गणेश प्रसन्न होतात.

शमीपत्र अर्पणाचं महत्त्व

हिंदू परंपरेनुसार, बुधवारच्या दिवशी गणेशपूजेत शमीपत्र अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात.

दूर्वा अर्पण करा

बुधवार हा दिवस बुधदेवतेच्या पूजेसाठीही मानला जातो. जर तुम्हाला बुधदेव आणि भगवान गणेश दोघांचेही आशीर्वाद हवे असतील तर या दिवशी गणेशाला दूर्वा अर्पण करावी. शक्य असल्यास तीन किंवा पाच पानांची दूर्वा अर्पण करावी. असं केल्याने गणेशाची कृपा सहज प्राप्त होते.

सुपारी अर्पण करा

गणेशपूजेत सुपारीचं विशेष महत्त्व मानलं जातं. परंपरेनुसार, पानासोबत सुपारी अर्पण केल्यास शुभ फल प्राप्त होतं. तसंच जर गणेशमूर्ती किंवा चित्र उपलब्ध नसेल तर सुपारीला लाल दोऱ्याने बांधून तिला गणेशस्वरूप मानून पूजा केली जाते.

सिंदूर अर्पण करावं

सनातन परंपरेमध्ये सिंदूराला मंगलाचं प्रतीक मानण्यात येतं. बुधवारच्या दिवशी गणेशाला सिंदूर अर्पण करणं अत्यावश्यक मानण्यात येतं. अशी मान्यता आहे की, सिंदूर अर्पण केल्याने गणेश लवकर प्रसन्न होतात. सिंदूर हा सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे आणि त्याच्या प्रभावाने नकारात्मकता दूर होते.

भोगाचे महत्त्व

गणेशाला अर्पण केल्या जाणाऱ्या भोगामध्ये मोदक आणि मोतीचूर लाडूंना विशेष महत्त्व आहे. हे दोन्ही पदार्थ गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. याशिवाय नारळ, ऊस, केळी यांसारखी फळेही गणेशाला आवडतात. ही फळे गणेशपूजेत अर्पण केल्यास शुभ फलाची प्राप्ती होते.

गणेशाची पूजा कोणत्या दिवशी करणे शुभ मानले जाते?

बुधवारच्या दिवशी गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते.

शमीपत्र अर्पण करण्याचा काय फायदा होतो?

अडकलेली कामे मार्गी लागतात आणि अडथळे दूर होतात.

बुधवारी गणेशाला कोणती वस्तू अर्पण करावी?

दूर्वा, सुपारी आणि सिंदूर अर्पण करावे.

सुपारीचे गणेशपूजेत काय महत्त्व आहे?

सुपारी गणेशाला प्रिय आहे आणि तिला स्वरूप मानून पूजा करता येते.

गणेशाला कोणते भोग अर्पण करावेत?

मोदक, मोतीचूर लाडू, नारळ, ऊस आणि केळी अर्पण करावेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: दुपारी वेळ काढून येतो सिमेंट लावायला..., रुग्णालयाच्या बांधकामावरून अजित पवार संतापले; अधिकाऱ्यांना झापलं, VIDEO

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

Meenatai Thackeray : शिवसैनिक आक्रमक; दादरमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला | VIDEO

Amruta Deshmukh: तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या...

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा धुमाकूळ; शेतातील पिके उध्वस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT