Upcoming Smartphone in December 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Upcoming Smartphone in December 2023: डिसेंबर महिन्यात लाँच होणार ५ हटके फोन; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् बरंच काही

Upcoming Smartphone In December Month 2023: डिसेंबरच्या महिन्यात म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही मोबाईल घेत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. या महिन्यात काही हटके स्मार्टफोन लाँच होणार आहेत.

Vishal Gangurde

Upcoming Smartphone In December Month:

डिसेंबरच्या महिन्यात म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही मोबाईल घेत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. या महिन्यात काही हटके स्मार्टफोन लाँच होणार आहेत. तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर डिसेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागणार आहे. या स्मार्टफोन्समध्ये रेडमी, वनप्लस आणि सॅमसंग या स्मार्टफोनचा सामावेश आहे. (Latest Marathi News)

सॅमसंग गॅलक्सी M44

लाँचची तारीख - डिसेंबर

अंदाजे किंमत - २९,९९९ रुपये

सॅमसंग गॅलक्सी M44 5G स्मार्टफोन ६ जीबी रॅम या स्मार्टफोन्समध्ये असणार आहेत. या फोनमध्ये एन्ड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टम असणार आहेत. तर फोनमध्ये ६.५८ इंच डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये १२०HZ रिफ्रेश रेट देखील असणार आहे. फोनमध्ये ५० MP कॅमेऱ्यासह २ MP चे दोन कॅमेरा आहे. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे. तसेच फास्ट चार्जिंग यूएसबी- सी पोर्ट असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Honor 100

लाँच तारीख - डिसेंबर

अंदाजे किंमत - ३० हजार रुपये

हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.लवकरच हा फोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. तसेच या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट असणार आहे. या फोनसहित HONOR X8B आणि HONOR X9B लाँच करण्यात येणार आहे.

वनप्लस १२

लाँच तारीख - ४ डिसेंबर

अंदाजे किंमत - ६० हजार किंमत

हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये १२०hz एडॉप्टिव रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये ५० MP सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ५० MP अल्ट्रा वाइड कॅमेरा सेन्सर देखील फोनमध्ये आहे. तसेच ३२ सेल्फी सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे.

IQOO 12

लाँच तारीख - डिसेंबर

अंदाजे किंमत - २५ ते ३० हजार रुपये

फोनमध्ये ६.७८ इंच १.५ k फ्लॅट एलटीपीओ एमोटेड डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये १४४ HZ व्हेरिएबल रिफ्रेश रेट मिळेल. फोनमध्ये १४०० nits पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. फोनमध्ये 2160Hz PWM डिमिंग टेक्नोलॉजी देखील आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅन 8 जेन चिपसेट देण्यात आली आहे.

फोनच्या रियरमध्ये ५० MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 50MP 150° अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये १६ MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

redmi 13c

लाँच तारीख - ६ डिसेंबर

अंदाजे किंमत - १० हजार रुपये

फोनमध्ये ६.७४ इंच hd+ डिस्प्ले देण्यात आला आहे.फोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेट आणि ४५० nits पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. तर फोनमध्ये MediaTek Helio G85 देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT