Upcoming Cars October 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Upcoming Cars October 2023 : खुशखबर ! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार या 3 शानदार कार, वाचा संपूर्ण यादी

Upcoming Cars In October : ऑटो क्षेत्रातील या कंपन्यांनी दिवाळीच्या आधी आपल्या कार लाँच करणार आहेत.

Shraddha Thik

Upcoming Cars :

भारतीय बाजारात सध्या गणेश उत्साहाचं वातावरण होतं . हा उत्साह आता आणखी वाढणार आहे. कारण दिवाळीपूर्वी भारतात 3 नवीन दमदार कार्स लाँच होणार आहेत. सणासुदीच्या काळात वाहन निर्मातेही चांगल्या सवलती देत असतात. यामुळे या कार्सना सणासुदीच्या हंगामात ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. अशा स्थितीत कार घेण्याचा विचार करत असाल तसेच कारची अपडेटेड व्हर्जन मिळवू इच्छित असाल. त्यासाठी थोडी वाट पाहणे योग्य ठरेल.

ऑटो क्षेत्रातील या कंपन्यांनी दिवाळीच्या आधी आपल्या कार (Car) लॉन्च करण्याचे ठरवले आहे, जेणेकरून कंपन्यांना सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात बुकिंग्स मिळतील. यात ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारपेठेत 3 दमदार गाड्या लाँच होणार आहेत. यामध्ये टाटा पंच EV, टाटा हॅरियर सफारी फेसलिफ्ट आणि निसान मॅग्नाइट कुरो यांची नावे आहेत.

भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार्‍या कारबद्दल जाणून घेऊया -

Tata Punch EV

टाटा मोटर्स ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पंच SUV इलेक्ट्रिक अवतारात लाँच (Launch) करेल अशी अपेक्षा आहे. कार निर्मात्याने यापूर्वी कन्फर्म केली होती की ती या वर्षाच्या अखेरीस तीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करेल. या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेली Nexon EV फेसलिफ्ट या तिघांपैकी पहिली होती. पंच ईव्ही हे सध्याच्या सणासुदीच्या काळात कंपनीचे पुढील उत्पादन असणार आहे.

लाँचच्या अगोदर, टाटा पंच EVअनेक वेळा भारतीय रस्त्यांवर चाचणी करताना दिसले आहे. हेरियर आणि सफारी सारख्या फ्लॅगशिप SUV द्वारे प्रेरित पंच EV पुन्हा डिझाइन केलेल्या फ्रंट फेससह येईल हे स्पाय शॉट्सवरून दिसून येते. यात उभ्या स्टॅक केलेला एलईडी हेडलाइट सेटअप तसेच डिजिटल लोगोसह टाटाचे नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळू शकते, जे नेक्सॉन EV मध्ये प्रथमच सादर केले गेले.

Tata Harrie आणि Tata Safari Facelift

टाटा मोटर्सने हॅरियर आणि सफारी सारख्या दोन प्रमुख SUV च्या फेसलिफ्ट आवृत्त्या लाँच करण्याची देखील अपेक्षा आहे. दोन्ही एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी काही महिन्यांपासून चाचणी (Test) घेत आहेत. या SUV मध्ये सध्यातरी लोखंडी जाळी, उभ्या एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएलच्या नवीन सेटसह पुन्हा डिझाइन केलेल्या फ्रंट फेससह येण्याची अपेक्षा आहे. दोन्ही SUV मध्ये कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत.

Nissan Magnite KURO

जपानी कार निर्मात्याने यापूर्वीच ऑक्टोबरमध्ये त्यांच्या मॅग्नाइट एसयूव्हीची विशेष आवृत्ती लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. निसानने सप्टेंबरमध्ये मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनसाठी बुकिंग सुरू केले आहे. SUV साठी बुकिंग भारतभरातील निसान डीलरशिपवर आणि ऑटोमेकरच्या अधिकृत वेबसाइटवर 11,000 रुपयांमध्ये करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT