UGC New Rule For NET And PhD Exam  ANI
लाईफस्टाईल

UGC New Rule on PHD And NET: आता ४ वर्षाच्या ग्रॅज्युएशननंतर थेट देता येणार NET ची परीक्षा; UGC चा नवीन नियम

UGC NET and PHD NEW Rules Explained in Marathi: ज्या विद्यार्थ्यांनी FYUP पूर्ण केले आहे किंवा ८ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेत आहेत ते या नवीन प्रणालीनुसार पात्र असतील. चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण असणं आवश्यक आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UGC New Rule On NET And PhD:

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) NET संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. चार वर्षांची पदवी (FYUP) घेणारे विद्यार्थी आता थेट UGC NET ची परीक्षा देऊ शकतात आणि PhD करू शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हा निर्णय घेतलाय. JRF सह किंवा त्याशिवाय पीएचडी करण्यासाठी ४ वर्षांच्या अंडरग्रॅजुएट प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड मिळालेली असावी असं UGC ने म्हटलंय.

सध्याच्या प्रणालीमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (NET), विद्यार्थ्यांना केवळ ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर (PG) पदवी आवश्यक आहे. नवीन नियमांनुसार आता चार वर्षांची पदवी असलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात. UGC चे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांच्या मते, जे विद्यार्थी चार वर्षांचा अंडरग्रॅजुएट प्रोग्राम (FYUP) पूर्ण करतात आणि पदवी प्राप्त करतात ते थेट पीएचडी करण्यासाठी पात्र मानले जाणार आहेत, तसेच ते हे विद्यार्थी नेट परीक्षाही देऊ शकतात.

मात्र यासाठी यूजीसीने काही अटीही ठेवल्यात. ज्या विद्यार्थ्यांनी FYUP पूर्ण केले आहे किंवा ८ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेत आहेत ते या नवीन प्रणालीनुसार पात्र असतील. चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण असणं आवश्यक आहे. गुणांऐवजी ग्रेड देण्याची पद्धत असून तेथे ७५ टक्के गुणांच्या बरोबरीचा ग्रेड असावेत. SC, ST, OBC, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये काही सूट दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT