Success Story : बकऱ्या वळणाऱ्या रोहिणीची गगन भरारी; जपानी भाषेचं शिक्षण घेत मिळवली लाखोंची नोकरी

Buldana Girl : बुलढाणा शहरापासून केवळ 7 किमी अंतरावर कोलवड नावाचे गाव आहे. वडील अनिल गवई मोलमजुरी करतात. गरिबीची परिस्थिती, घरी 10 बकऱ्या यावर उदरनिर्वाह चालत असल्याने उच्चं शिक्षण मुलीला देणे शक्य नव्हते.
Success Story : बकऱ्या वळणाऱ्या रोहिणीची गगन भरारी; जपानी भाषेचं शिक्षण घेत मिळवली लाखोंची नोकरी
Published On

संजय जाधव

Buldana Success Story :

स्वत:चं नशीब किंवा आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी आपल्याला स्वत:लाच संघर्ष करावा लगातो. असाच काहीसा संघर्ष बुलढाण्याच्या एका तरुणीने केला आणि आज ती जपानमध्ये लाखो रुपये कमवत आहे. तिच्या कामगिरीमुळे कुटुंबियांची आणि गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Success Story : बकऱ्या वळणाऱ्या रोहिणीची गगन भरारी; जपानी भाषेचं शिक्षण घेत मिळवली लाखोंची नोकरी
Buldhana News: ब्रेकिंग! आमदार संजय गायकवाड यांची बंडखोरी; बुलढाणा लोकसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज

घरची परिस्थिति जेमतेम वडील मजुरी करतात व तीने 10 वी पास होऊन शेतकी शाळेचा डिप्लोमा घेतल. या शिक्षणासोबत बुलढाण्यातील बो ट्री फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून जपान या विदेशी भाषेचे तिने ज्ञान घेतले आणि जपान भाषेची परीक्षा पास झाली. त्याच आधारावर 18 वर्षीय रोहिणी गवई ही आज जपान देशाकडे रवाना झालीये.

बुलढाणा शहरापासून केवळ 7 किमी अंतरावर कोलवड नावाचे गाव आहे. वडील अनिल गवई मोलमजुरी करतात. गरिबीची परिस्थिती, घरी 10 बकऱ्या यावर उदरनिर्वाह चालत असल्याने उच्चं शिक्षण मुलीला देणे शक्य नव्हते.

रोहिणीला 10वी पास झाल्यानंतर शेतकी शाळेत शिक्षण दिलं गेलं आणि डिप्लोमा मिळाला. याच शिक्षणासोबत बुलढाण्यात जपान भाषेचं शिक्षण देणारी बो ट्री फाउंडेशन संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेत जपान भाषेचं शिक्षण घेत ती परीक्षा पास झाली.

या संस्थेमार्फत जपान देशातील विविध कंपन्या तिच्या संपर्कात आल्या. पुढे तिने फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखतीमध्ये पास झाल्यावर या कंपनीने तात्काळ रोहिणीला नियुक्तीपत्र पाठविले. इतकेच नाही तर सोबत विजा सुद्धा पाठवला. जपान देशातील कंपनीने रोहिणीला एक लाख अठ्ठावन हजार रुपये महिना पगार फिक्स केलाय.

आपल्या लेकीने घेतलेली गगन भरारी पाहून तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. जपान देशात राहण्यासाठी आणि जाण्यासाठी तिकिटाचे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आधी तिच्या कुटुंबासमोर उभा होता. अशावेळी तिच्या वडिलांनी आपलं राहतं घर गहान ठेवलंय आणि व्याजाने रोहिणीला पैसे काढून दिलेत. ती काल एकटी मुंबई आणि मुंबईहून जपान देशाकडे रवाना झाली.

Success Story : बकऱ्या वळणाऱ्या रोहिणीची गगन भरारी; जपानी भाषेचं शिक्षण घेत मिळवली लाखोंची नोकरी
Pune Crime News: पुण्यात चाललयं काय? देशी दारुच्या दुकानात राडा, डोक्यात फोडल्या बाटल्या; धक्कादायक CCTV समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com