vidya balan Fitness Secret Saam Tv
लाईफस्टाईल

Actress Fitness Secret: ना जिम केली ना वर्कआउट, या अभिनेत्रीने तंत्राच्या साहय्याने केले वजन कमी...

fitness secret: विद्या बालन केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या फिटनेसनेही लोकांना प्रभावित करते. बॉलीवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्रीने वर्कआउट न करता आपले वजन कमी केले आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकेकाळी विद्या बालनला तिच्या वाढत्या वजनामुळे बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्या बालनने तिचे वजन बऱ्याच अंशी नियंत्रित केले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अभिनेत्रीचे वजन कमी करण्याचे रहस्य वर्कआउट नाही. बहुतेक लोकांप्रमाणे तुम्हालाही असे वाटत असेल की जिममध्ये गेल्याशिवाय वजन कमी होऊ शकत नाही. पण विद्या बालनने अश्या प्रकारे वजन कमी केलं.

आहारावर लक्ष केंद्रित केले

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, जिममध्ये तासनतास घाम गाळूनही तिला वजन कमी करता येत नव्हते. अलीकडेच विद्या बालनने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती आयुष्यभर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. पण नंतर एका न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्याने अभिनेत्रीने तिच्या डाएट प्लॅनवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.

वजन वाढण्याचे कारण

न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार विद्या बालनचे वजन फॅटमुळे नाही तर जळजळीमुळे वाढत होते. न्यूट्रिशनिस्टने विद्या बालनला काम करू देण्यास नकार दिला होता. मात्र तिने जवळपास एक वर्ष काम केले नाही. विद्याने त्या गोष्टी खाणे बंद केले ज्यामुळे तिच्या शरीरात जळजळ होत होती. विद्याने वर्कआउट न करता वजन कमी केले.

वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात आणि प्रत्येक कारणाचा उपचार वेगळा असू शकतो. जर तुम्हाला तुमच्या वाढत्या वजनाचे नेमके कारण माहित असेल तर तुम्ही सहज वजन कमी करू शकाल. तुम्हालाही तुमच वजन कमी करण्याचा करायचा असेल, तर तुम्ही एखाद्या चांगल्या न्यूट्रिशनिस्टच्या सल्ला घेऊ शकता.

Edited by - Archana Chavan

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये शिवसेना मनसेची युती होणार का?

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT