Yoga For Piles: मुळव्याधापासून सुटका हवीये? 'ही' 2 योगासनं हमखास करतील मदत

yoga poses for piles: मुळव्याध ही समस्या म्हणजे एक गंभीर आजारच आहे.
Yoga For Piles
Piles Control TipsSaam Tv
Published On

मुळव्याध ही समस्या म्हणजे एक आजारच आहे. ज्यामध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेरील नसांमध्ये सूज येते, जळजळ होते. त्यामुळे मस्से तयार होतात आणि प्रचंड वेदना सुद्धा होतात. बद्धकोष्ठता,गर्भधारणा, लठ्ठपणा, बराच वेळ एकाच जागेवर बसणे, अन्नात फायबरचे प्रमाण नसणे, कमी पाणी पिणे अशा तक्रारींमुळे मुळव्याधाची समस्या उद्धभवते. जर तुम्ही या समस्येला कंटाळले असाल तर पुढील २ योगांचा वापर करून मुळव्याधाच्या समस्येला कायमचे विसराल.

मुळव्याधापासून आराम मिळवण्यासाठी पुढील योगासने करावी:

उत्तानासन

उत्तानासन हे मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तसेच आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुधारते. योगासनांमध्ये विविध आसनांचा समावेश आहे. त्यातील एक म्हणजे उत्तानासन. आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी या आसनाचा वापर केला जातो.

Yoga For Piles
Healthy Poha Recipe: वजन कमी करायचं पण चवीत बदल नकोय? अगदी १० मिनिटांत बनवा हेल्दी-टेस्टी पोहे

उत्तानासन कसे करावे?

सर्वप्रथम चटईवर सरळ ताठ उभे राहा. मग दिर्घ श्वास घ्या आणि हात वरच्या दिशेला हळूहळू घ्या.नंतर श्वास सोडताना पुढच्या दिशेला वाकून पायांच्या बोटांना स्पर्श करा. हे करताना गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ५ ते ७ सेकंद तुम्ही या स्थितीत थांबा मग पुन्हा हळूहळू हात वर घ्या. हे करताना श्वास सोडा. याने झोपेची समस्या दूर होईल.

बद्ध कोणासन

बद्ध कोणासनने आपल्या शरीराच्या खालच्या बाजूची लवचिकता वाढते. बद्ध कोणासन आपल्या शरीरातील आतल्या अवयवांना मजबूत करण्याचे काम करते. तसेच मुळव्याधाच्या समस्येला घालवून टाकण्यास मदत करते.

बद्ध कोणासन कसे करावे?

बद्ध कोणासन करताना सर्वप्रथम चटईवर ताठ बसा. आता समोर पाय घ्या आणि दोन्ही पायाचे तळवे मांडी घालतो त्या प्रमाणे बसून चुकटवा. हे आसन करुन तुम्ही मिनीटभर बसू शकता. मग पाय मोकळे करून झटका. पाहा या योगासनांचे नियमित पालन केल्याने तुम्हाला मुळव्याधापासून आराम मिळेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

Yoga For Piles
Cold & Cough : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय तुमच्या किचनमध्येच आहे, डॉक्टरच्या औषधांशिवाय व्हाल बरे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com