Chandra Grahan 2026 saam tv
लाईफस्टाईल

February Grahan 2026: फेब्रुवारीमध्ये १५ दिवसात दोनवेळा लागणार ग्रहण; किती धोकादायक आहे ग्रहण? काय आहेत संकेत

February two eclipses signs: फेब्रुवारी महिन्यात अवघ्या १५ दिवसांच्या अंतराने दोन ग्रहण होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून त्याचे परिणाम मानवी जीवनावर, आरोग्यावर आणि समाजावरही दिसतात असे मानले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात, सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानण्यात येतात. फेब्रुवारी २०२६ मध्ये सूर्य आणि चंद्रग्रहण होत असतं. सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. ३ मार्च २०२६ रोजी होलिका दहन दरम्यान चंद्रग्रहण होणार आहे. महत्त्वाचा फरक असा आहे की, हे ग्रहण १५ दिवसांच्या आत होणार आहे.

फाल्गुनमध्ये होणार २ ग्रहणं

१७ फेब्रुवारी रोजी फाल्गुन अमावस्येला होणारं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र ३ मार्च २०२६ रोजी होणारं चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. शास्त्रांमध्ये ग्रहणांना अशुभ मानण्यात आलं आहे. त्यांच्या प्रभावामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, असं म्हणतात. तर याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होऊ शकतो.

संकेत काय आहेत?

  • १५ दिवसांत दोन ग्रहणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते. आगीच्या घटना वाढू शकतात.

  • भूकंप आणि पूर येऊ शकतात आणि कायद्याविरुद्ध मोठी आंदोलन उभी राहू शकतात.

  • दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसून येतील.

  • सत्तेच्या रचनेत बदल होतील. प्रमुख नेत्यांकडून दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे.

ग्रहणाच्या वेळी काय करावं आणि काय करू नये?

  • जर देवाचे मंत्र जपले तर त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो.

  • ग्रहणाचा काळ हा आध्यात्मिक साधना करण्याचा काळ मानला जातो. या काळात देवाच्या मूर्ती आणि चित्रांना स्पर्श करण्यास मनाई आहे.

  • चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, कारण हा काळ संवेदनशील असतो.

  • मान्यतेनुसार, सुतक काळात जपलेले मंत्र प्रभावी मानले जातात. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात मंत्र जप करावेत. यामुळे आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होतं.

  • ग्रहणाच्या वेळी बाहेर जाऊन सूर्य किंवा चंद्राकडे थेट पाहणं टाळा, कारण यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते.

  • ग्रहण काळात झोपणं आणि खाणं निषिद्ध आहे, परंतु गर्भवती महिला आरोग्याच्या कारणास्तव ताजी फळे, सात्विक अन्न आणि आवश्यक औषधे घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: अजूनही HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Holi 2026 : होळीला गोड खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा खानदेशी स्टाइल डुबुक वड्यांचा झणझणीत रस्सा

Maharashtra Live News Update : नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीवरून नवा वाद

Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान UAE मध्ये अडकली अक्षय कुमारची हिरोईन, पोस्ट करत म्हणाली- "भयानक परिस्थिती, मला घरी जायचे..."

VSR विमान कंपनीच्या मालकाला अटक करा, जय पवारांची मागणी, थेट तो व्हिडिओ केला पोस्ट

SCROLL FOR NEXT