Back Pain Yoga Saam Tv
लाईफस्टाईल

Back Pain Yoga : कंबरदुखीच्या समस्येपासून हैरान आहात? 'हा' योगा ठरेल फायदेशीर

Yoga Tips : कंबरदुखी पासून आराम मिळण्यासाठी अनेक व्यक्ती पेन किलरचे सेवन करतात.

कोमल दामुद्रे

Yoga For Back Pain : कंबरदुखी ही समस्या आजकाल सामान्य समस्या झाली आहे. त्याचबरोबर ऑफिसमध्ये लगातार बसून काम करून आणि घरामधील गृहिणीनी सतत उभ राहून काम केल्याने ही समस्या उद्भवते. कंबर दुखी पासून आराम मिळण्यासाठी अनेक व्यक्ती पेन किलरचे सेवन करतात.

परंतु हीच पेन किलर तुमच्या शरीराला (Health) तात्काळ आराम देऊ शकते परंतु नंतर त्याचे साईड इफेक्ट्स देखील पाहायला मिळतात. तुम्ही सुद्धा बॅक पेन या समस्येने झुरत असाल तर, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रुटीन बदला.

सोबतच योगा (Yoga) केल्याने देखील कंबरदुखी ठीक केली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या एक्सरसाइजमुळे तुम्हाला कंबर दुखी पासून आराम मिळू शकतो.

1. मार्जरी आसन :

मार्जरी आसनाला कॅट - काऊ पोज म्हणून ओळखले जाते. कंबर आणि माकड हाडांमध्ये दुखणे असलेल्या व्यक्तींनी कॅट - काउ पोज केली पाहिजे. अशातच ही पोस्ट केल्याने तुम्हाला भरपूर आराम मिळू शकतो. तुमच्या पाठीचे आणि कमरेचे दुखणे मी होऊन मजबुती मिळेल. हे असं केल्याने तुमचे शरीर स्ट्रेच होते. यामुळे तुमचे पाचन अंग नियमितपणे काम करते.

Cat Pose

2. कशा पद्धतीने करावे कॅट -

काऊ आसन हे आसन सगळ्या प्रकारच्या वयोगटातील व्यक्ती करू शकतात. परंतु जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हे असं करू नये. हे असं करण्यासाठी सर्वात आधी गुडघ्यांवरती बसायचे आहे. त्यानंतर दोन्हीही हात जमिनीवर ठेवायचे आहेत. जशा पद्धतीने चार पायी जनावरे चालतात कशा पद्धतीने तुम्हाला पोज करायची आहे. त्यानंतर श्वास घेताना मान वरती उचलायची आहे. सोबतच कंबरेला वरच्या दिशेने उचला. त्यानंतर श्वास सोडताना मान खाली करा आणि पोटाला छातीला लावायचा प्रयत्न करा.

3. अनेक वेळा करा :

ही प्रक्रिया तुम्हाला दहा ते पंधरा वेळा हळूहळू करायची आहे. थोड्या दिवसांनी तुम्ही वेळ वाढवून हे आसन करू शकता. हे आसन केल्याने पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेन किलर खाण्याची गरज भासणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT