Back Pain Solution at Home : कंबरदुखीपासून सुटका हवीये ? 'या' 5 घरगुती पद्धती वापर करा, मिळेल आराम !

80 टक्के लोक कंबरदुखी या आजाराने ग्रस्त आहेत. अशातच कंबरदुखी होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात.
Back Pain Solution at Home
Back Pain Solution at HomeSaam Tv

Back Pain Solution at Home : कंबरदुखी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये लोकांना बॅक पेनचा त्रास होतो. ज्यामुळे लोकांना चालताना फिरताना देखील त्रास होतो.

पण तुम्हाला हे माहित आहे का की, कंबर दुखीपासून सुटकारा मिळू शकतो. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमची कंबर दुखीवर आराम मिळवू शकता.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, 80 टक्के लोक कंबरदुखी या आजाराने ग्रस्त आहेत. अशातच कंबरदुखी होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉममध्ये छापलेल्या एका बातमीनुसार, आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत की कंबर दुखी पासून आराम कसा मिळवू शकाल.

Back Pain Solution at Home
Women Health Issues : महिलांना जडतात 'या' 3 प्रकारच्या गंभीर समस्या, वेळीच लक्ष न दिल्यास भोगावे लागतात परिणाम !

1. फिजिकल ऍक्टिव्हिटी करा :

कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी दैनंदिन जीवनशैली (Lifestyle) मधील काही गोष्टी बदला. तुम्ही दररोज एक्सरसाइज स्टार्ट करा. दररोज व्यायाम केल्याने त्याचबरोबर वॉकिंग आणि स्ट्रेचिंग केल्याने बॉडीमध्ये एंडॉफ्रिन नावाचा पदार्थ रिलीज होतो. ज्याने तुमचे बॅक पेन खूप कमी होते. त्याचबरोबर पायांच्या अंगठ्यांना वाकून हात लावणे आणि कोब्रा पोज ट्राय केल्याने तुमची कंबर दुखी दूर होऊ शकते.

2. तेलाने मसाज करा :

कंबर दुखीसाठी तुम्ही ऑइल (Oil) मसाज करणे अत्यंत गरजेचे आहे. अशातच तेलाने मालिश करण्यासाठी राईचे तेल वापरणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर अंघोळीच्या काही वेळ आधी तुम्हाला कमरेवर तेलाने मालिश करायची आहे. त्यानंतर कोमट पाण्याने (Water) अंघोळ करायची आहे. असं केल्याने तुमचे बॅक पॅन लवकर ठीक होईल.

Back Pain Solution at Home
Back Pain Solution at HomeCanva

3. योग्य पद्धतीने बसा :

ऑफिसमध्ये (Office) तासान तास काम करणारी लोक बऱ्याचदा चुकीच्या पोझिशनमध्ये बसतात. ज्यामुळे तुमच्या कंबरमध्ये दुखू लागते. अशातच कम्प्युटर किंवा लॅपटॉप समोर काम करताना सरळ बसण्याची सवय लावून घ्या. सोबतच मान सुद्धा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुम्ही बॅक पेन अवॉइड करू शकता.

Back Pain Solution at Home
Health Tips for Pregnant Women : मद्यपान करणाऱ्या महिलांनो सावधान; गरोदरपणात मद्य पिण्याचे भयंकार परिणाम आले समोर

4. गरम पाण्याची पिशवी वापरा :

कंबर दुखीसाठी तुम्ही गरम पाण्याची पिशवी वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही थंड पाण्याची पिशवी देखील कंबर दुखीसाठी वापरू शकता. तुमच्या कमरेला सूज आली असेल तर हॉट किंवा कोल्ड बॅगने सूज निघून जाईल. अशातच तुम्ही टॉवेलला गरम पाण्यामध्ये भिजवून कमरेवरती ठेवून कंबर शेकु शकता

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com