head and neck cancer google
लाईफस्टाईल

Head Neck Cancer Symptoms: गिळताना त्रास होतोय? वेळीच व्हा सावध! डोकं अन् मानेच्या कॅन्सची असू शकतात लक्षणे

Early Diagnosis: डोके आणि मानेच्या कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला साधी वाटतात. गिळताना त्रास, आवाजात बदल, तोंडात न भरणारी जखम ही गंभीर चिन्हे असू शकतात. वेळेवर तपासणी महत्वाची.

Sakshi Sunil Jadhav

डोके आणि मानेच्या कॅन्सरची लक्षणे अनेकदा साधी आणि दुर्लक्षित होतात.

गिळताना त्रास, आवाजात बदल आणि तोंडातील जखम दुर्लक्षित करू नका.

तंबाखू, गुटखा आणि मद्यपान हा या कॅन्सरचा सर्वात मोठा धोका आहे.

सध्याच्या कामाच्या धावपळीमुळे शरीराच्या समस्यांकडे लोक मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये सगळ्यात घातक आजार म्हणजे डोके आणि मानेचा कॅन्सर. कारण इतर कॅन्सरप्रमाणे या कॅन्सरची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे या रोगाचे निदान झालेले उशिरा कळते आणि तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असते. कारण कॅन्सरग्रस्त रुग्ण फार दिवस चांगल्या प्रकारे जीवन जगू शकत नाहीत. म्हणूनच तुम्ही वेळीच या आजाराची ओळखून तुमचा व तुमच्या कुटूंबातील इतरांचा जीव वाचवू शकता.

मानेच्या आणि डोक्याच्या कॅन्सरविषयी माहिती देताना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील डॉ. ऍलन एल. हो, हेड अँड नेक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट यांनी काही महत्वाचे संकेत आणि लक्षणांची माहिती दिली.

जागतिक पातळीवर डोके आणि मानेच्या कॅन्सरचा हा सातव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. दरवर्षी सुमारे 8,90,000 नवीन रुग्ण आणि 4,50,000 मृत्यू या आजारामुळे होतात. भारतात या कॅन्सरचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्याचे अहवाल स्पष्ट झाले आहे. डोके आणि मानेचा कॅन्सर हा एकत्रित शब्द आहे. यामध्ये नाक, सायनसेस, कान, तोंड, जीभ, घसा, लाळग्रंथी, त्वचा आणि थायरॉइडमधील ट्युमरांचा समावेश होतो.

या कॅन्सरची चिन्हे अनेकदा सामान्य आजारांसारखी वाटतात. काही महत्त्वाची लक्षणे म्हणजे चेहऱ्यावर सातत्याने राहणारी वेदना, जबड्यात कडकपणा किंवा हालचालींची अडचण, न भरणारी तोंडातील जखम, खाताना किंवा गिळताना त्रास किंवा जळजळ, आवाजात बदल, दम लागणे, वारंवार नाक बंद होणे, मान किंवा जबड्यात गाठ दिसणे, वजन कमी होणे, कानात वेदना किंवा कमी ऐकू येणे आणि तोंडात लाल किंवा पांढरे डाग दिसणे.

या आजाराचा धोका वाढवणाऱ्या कारणांमध्ये एचपीव्ही व्हायरस, तंबाखू सेवन, मद्यपान, वयोमान, किरणोत्सर्गाचा संपर्क, गुटखा किंवा पान-तंबाखू चघळण्याची सवय, खराब दंतस्वच्छता आणि फळे-भाज्या कमी खाणे यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांच्या मते, नियमित तपासणी आणि वेळेवर लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः डॉक्टर, डेंटिस्ट आणि ईएनटी स्पेशालिस्ट यांनी उच्च जोखमीच्या व्यक्तींमध्ये नियमित तोंड, घसा आणि मान तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Batata Bhaji: उकडलेल्या बटाट्याची पिवळी झणझणीत भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : मुंबईच्या माहीम पूर्व झोपडपट्टी परिसरात मोठी आग

Siddhanth Kapoor: बॉलिवूडवर पुन्हा ड्रग्जचं सावट; २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला समन्स

Solapur Accident : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, सोलापूरमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू, गाडीचा चक्काचूर

कल्याणमध्ये चाललंय काय? फ्रँकी चालकाला मारहाण, क्षुल्लक कारणावरून राडा, पोलिसांची बघ्याची भूमिका?

SCROLL FOR NEXT