Travel Trip
Travel Trip  Saam Tv
लाईफस्टाईल

Travel Trip : महाशिवरात्रीनिमित्त उज्जैन 'महाकाल'चे दर्शन घ्या, असे आहेत मंदिराचे नियम; कसे कराल संपूर्ण प्लानिंग?

Shraddha Thik

Mahakal Ujjain Darshan :

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर आहे. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते. यंदा तुम्हीही महाशिवरात्रीला उज्जैनमधील महाकालेश्वरला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

मध्य प्रदेशामधील उज्जैन येथे महाकालाचे मंदिर आहे. दु:ख आणि संकटांवर विजय मिळवणाऱ्या भगवान शंकराचे भक्त जगभरातून येथे येतात. तुम्ही अजून महाकाल बघायला गेला नसाल तर प्लान करू शकता. महाकाल मंदिरात काय नियम (Rules) आहेत आणि तुम्ही कसे भेट देऊ शकता? जाणून घ्या...

महाकाल उज्जैनला कसे पोहोचेल?

मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांकडे उज्जैनला जाण्यासाठी तीन पर्याय आहेत. बस, ट्रेन आणि फ्लाइट. रेल्वे प्रवास बजेट (Budget) आणि आरामाच्या दृष्टीने चांगला आहे. मुंबई येथून सकाळी 7:45 वाजता इंदूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने तुम्ही इंदूरला पोहोचू शकता. मंदिरापर्यंत जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरून तुम्ही बस किंवा टॅक्सी घेऊ शकता.

उज्जैनमधील या मंदिरांना भेट द्या

  • हरसिद्धी माता मंदिर

  • बडा गणेश मंदिर

  • महाकाल मंदिर

  • काल भैरव मंदिर

  • गढकालिका मंदिर

महाकालेश्वरचे VIP दर्शन

जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही मंदिरातील गर्दी टाळून व्हीआयपी दर्शन घेऊ शकता. बडा गणेश मंदिराजवळ एक तिकीट काउंटर आहे जिथून तुम्हाला 250 रुपयांचे टोकन मिळेल आणि तुम्ही VIP प्रवेशद्वारातून दर्शनासाठी पोहोचाल.

महाकाल मंदिराचे नियम

महाकाल मंदिर परिसरात मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे. गर्भगृहात दर्शनासाठी पुरुषांनी धोतर आणि कुर्ता तर महिलांनी साडी नेसणे बंधनकारक आहे. पाश्चात्य कपड्यांमध्ये तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. सामान्य दिवशी, लोकांना दुपारी 1 ते 4 या वेळेत मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याची परवानगी आहे. त्यानुसार दर्शनाचे नियोजन करा.

काल भैरव मंदिराला भेट द्या

महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर कालभैरवाचेही दर्शन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय तुमचा प्रवास अपूर्ण मानला जातो. महाकाल मंदिरापासून काळभैरव 5 किलोमीटर अंतरावर आहे. अशा पद्धतीने तुमचे महाकालचे दर्शन पूर्ण होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT