Vastu Tips For Salt: खरेदी करण्यापासून ते देण्यापर्यंतचे मीठाचे आहेत अनेक नियम; चुकी झाली तर होईल मोठं नुकसान

Vaastu Shaastra : वास्तुशास्त्रामध्ये मिठाशी संबंधित अनेक नियमांची माहिती देण्यात आलीय. मीठ दान करण्यापासून ते मीठ खरेदी करण्यापर्यंत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. चिमूटभर मीठ घेताना तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
Vaastu Shaastra  salt
Vaastu Shaastra saltgoogle

Vastu Tips for Salt:

मिठाचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. मीठ ज्याप्रकारे पदार्थ बनवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे तशाच तो आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाचा आहे. घराची स्वच्छता ते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर आपण करू शकतो. तसेच मीठ घरातील द्रारिद्याचे कारण देखील बनू शकते. (Latest News)

मिठाच्या योग्य उपयोगाने भिकारी व्यक्ती राजा बनवू शकतो. तर वापर योग्य नाही झाला तर राजाला भिकारी व्हावे लागते, अशी अनेक नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आली आहेत. या नियमांमध्ये मीठाचा योग्य वापर करण्यासाठी आणि मिठाशी संबंधित चुका टाळण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही विचार न करता बाजारातून मीठ विकत घेत असाल किंवा कोणाला मीठ देत असाल तर तुम्हाला वास्तुशास्त्रात सांगितलेले मिठाचे नियम माहित असले पाहिजेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीठ कधी आणि कोणत्या वेळी खरेदी करावे?

वास्तुशास्त्रानुसार मीठ खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मीठ कोणत्या दिवशी खरेदी करावे? मीठ कधी विकत घेऊ नये? कोणत्या दिवशी मीठ विकत घेऊ नये? असे नियम आपल्याला माहिती असायला हवेत. नियमानुसार शुक्रवारी मीठ खरेदी केले पाहिजे, ज्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद राहील. तर शनिवारी मीठ खरेदी करू नये. तसेच कोणताही दिवस असो परंतु सूर्यास्तानंतर किंवा रात्री कधीच मीठ खरेदी करू नये.

मीठ कधी देऊ नये?

नियमानुसार रात्रीच्या वेळी मीठ कोणालाही देऊ नये. जर कोणी तुमच्याकडे मीठ मागायला आले तर तुम्ही त्यांना स्पष्ट नकार द्यावा. रात्री मीठ खाल्ल्यास तुमच्या घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा वास करू शकते. तसेच माता लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते. वास्तुशास्त्रात शुक्रवारी मिठाचे दान करणे शुभ मानले जाते, परंतु संध्याकाळी मीठ दान करू नये. तसेच कोणाच्याच हातात मीठ देऊ नये. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही केलेले पाप-पुण्य दुसऱ्याच्या नावावर जात असते.

वास्तुशास्त्रानुसार किचनच्या दक्षिण दिशेला मीठ ठेवू नये. जर कोणी असे केले तर त्याला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. घरामध्ये गरीबी आणि नकारात्मक ऊर्जा राहत असते. घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही मीठ लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवू शकता. यामुळे लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो. मीठाचा हा उपाय तुम्ही शुक्रवारी करू शकता. तुम्हाला फक्त लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे, त्यात मीठ टाकायचे आहे. हे कापड गाठीमध्ये बांधून स्वयंपाकघरात ठेवावे लागेल.

Disclaimer:ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी साम टीव्हीने दिलीय. यासर्व गोष्टींशी साम टीव्ही सहमत नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com