Rasam Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Rasam Recipe : साऊथ इंडियन स्टाइल घरच्याघरी बनवा चटकदार रसम; वाचा साहित्य आणि कृती

Traditional Rasam Recipe : टेस्टी आणि चवदार रसम घरच्याघरी कसे बनवायचे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

आपण महाराष्ट्रात राहत असलो तरी देखील साऊथ इंडियन फूड सर्वांना आवडते. या पदार्थांनी संपूर्ण भारतभर प्रत्येकाच्या जिभेवर राज्य केलं आहे. येथील इडली, मेदूवडे, सांबार, रस्सम सर्वच पदार्थ एकापेक्षा एक आणि चविष्ट असतात. त्यामुळे प्रत्येकाला याची चव आवडते. इडली आणि मेदूवडे यांची रेसिपी अनेकांना माहिती झाली आहे. त्यामुळे आज आपण जरा हटके अशी रसमची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

पाणी - ४ कप

चिंच - २ चमचे

काळी मिरी - २ चमचे

जिरे - ३ चमचे

लसुण - ४ पाकळ्या

तेल - २ पळी

मिरची - २

कढीपत्त्याची पाने - ४

मोहरी - २ चमचे

टोमॅटो प्यूरी - १ वाटी

चिचेचं पाणी

मीठ - चवीनुसार

कृती

रसम बनवण्यासाठी सर्वात आधी एका टोपात पाणी घ्या आणि त्यात चिंच मिक्स करून भिजत ठेवा. चिंत अगदी १० ते १५ अगदी १ तास तरी भिजत राहिली पाहिजे. चिंच भिजत आहे तोवर पुढे एका खलबत्त्यात काळी मिरी घ्या. काळी मिरी यात बारीक ठेचून घ्या. त्यानंतर जिरे घ्या, जिरे देखील बारीक करून घ्या. तसेच याच खलबत्त्यात पुढे लसुण पाकळ्या टाका आणि त्याही बारीक, जाड वाटून घ्या.

आता पुढे दुसऱ्या एका टोपात तेल घ्या. तेल मस्त गरम झालं की त्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी सर्वात आधी तेलात मोहरी टाका. मोहरी मस्त तडतडली की, पुढे यामध्ये कढीपत्ते टाका आणि लाल मिरची मधोमध चिरून त्याचे दोन भाग करा. मिरची सुद्धा तेलात फोडणीमध्ये टाकून द्या.

त्यानंतर २ टोमॅटो घ्या. टोमॅटो गॅसवर जाळी ठेवून छान भाजून घ्या. याची साल काढून घ्या आणि मिक्सरला बारीक प्युरी बनवून घ्या. पुढे ही टोमॅटो प्युरी तेलाच्या फोडणीमध्ये सुद्धा मिक्स करा. शेवटी यात मीठ आणि हळद सुद्धा टाका. तसेच नंतर तुम्ही चिंच ज्या पाण्यात भीजत ठेवली होती ते पाणी यामध्ये ओतून द्या.

चिचेचं पाणी यात मिक्स करताना आधी चिंच पाण्यातच कुसकरून घ्या. तसेच चव जास्त आंबट होऊ नये म्हणून पाणी गाळून घ्या. गाळलेलं पाणी या टोपात ओता. अशा पद्धतीने पुढे याला एक उकळी येऊ द्या. रसमला उकळी आल्यानंतर चे खाण्यासाठी तयार होते. तुम्ही रसम नुसतं पिऊ शकता. तसेच यात भात मिक्स करून सुद्धा तुम्ही याचे सेवन करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT