Litti Chokha Recipe: बिहारचा प्रसिद्ध लिट्टी चोखा पदार्थ; एकदा खाल तर खातच राहाल, जाणून घ्या रेसिपी

litti chokha perfect recipe: आज केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक हा पदार्थ मोठ्या उत्साहाने खातात.चला तर जाणून घेवू कूकर मधली लिट्टी-चोखा रेसीपी.
Litti Chokha Recipe
Litti Chokha Recipeyandex
Published On

बिहारची प्रसिद्ध डीश म्हणजे 'लिट्टी-चोखा'.लिट्टी-चोखा आज आपल्या चवीमुळे जगभर प्रसिद्ध आहे.असे म्हणतात कि, मगध साम्राज्याच्या काळात लिट्टी-चोखा हा त्या काळातील सैनिकांसाठी अत्यंत पौष्टिक आणि पोर्टेबल खाद्यपदार्थ होता. कारण तो युद्धादरम्यान त्यांच्यासोबत नेला जाऊ शकतो. म्हणजेच लिट्टी-चोखा हा केवळ एक पदार्थ नाही, तर बिहारच्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे.लिट्टी-चोख्याची चव इतकी अनोखी आणि अप्रतिम आहे की,एकदा खाल्ल्यानंतर प्रत्येकाला ही डीश चक्क प्रेमात पाडते. आज केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक हा पदार्थ मोठ्या उत्साहाने खातात.चला तर जाणून घेवू कूकर मधली लिट्टी-चोखा रेसीपी.

साहित्य

लिट्टी बनवण्याचे साहित्य

२ कप गव्हाचे पीठ

२ टेबलस्पून ओवा

तूप

१/२ टीस्पून बेकिंग सोडा

२ते ३ चमचे दही

आवश्यकतेनुसार पाणी

चवीनुसार मीठ

मसाल्यासाठी लागणारे साहित्य

भाजलेल्या चन्याचे पिठ - १५० ग्राम

१ कांदा चिरलेला

१ चमचा ओवा

२ ते ३ चमचे लोणचे मसाला

५ते ६ हिरव्या मिरच्या चिरलेल्या

७ ते ८ लसूण पाकळ्यांची पेस्ट

२ ते ३ चमचे सरसोचे तेल (नसेल तर कुठलेही वापरु शकता)

२ ते ३ चमचे लिंबाचा रस

पाणी

कोथिंबीर

मीठ चवीनुसार

चोखा बनविण्यासाठी लागणारे साहित्य

२ भरताचे वांगे

२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे

२ टोमॅटो चिरलेले

१ मोठा कांदा चिरलेला

७-८ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

अर्धी वाटी चिरलेला पातीचा कांदा

मीठ चवीनुसार

३ ते ४ चमचे तेल

Litti Chokha Recipe
Diwali Special Dessert Recipe: थंडाई वापरुन घरच्या घरी बनवा शेवयांची 'ही' खास रेसिपी

कृती

सर्वप्रथम लिट्टी मध्ये लागणारा मसाला तयार करण्यासाठी सर्वात भाजलेल्या चन्याचे पिठ पीठ घ्या. त्यामध्ये वरील दिलेले सर्व साहित्य घालून चांगले एकत्र करून घ्या.हा मसाला एकदम ओलसर करु नका म्हणून पाणी फक्त ४ ते ५ चमचे पाणी वापरा.आता हा मसाला एका बाजुला ठेवा.पुढे लिट्टीचे साहित्य घ्या. गव्हाची कणिक घेऊन, त्यामध्ये ओवा, तूप, मीठ व बेकिंग सोडा घालून चांगले हाताने मिक्स करून घ्या.थोडे थोडे पाणी घालून कणिक चांगली मळून घ्या. तयार कणिक कॉटनच्या कापडाने १५ ते २० मिनिटे झाकून रेस्ट करायला ठेवा.

आता आपण लिट्टी तयार करायला घेवू. सर्वप्रथम तयार कणकेचे लहान मध्यम आकाराचे गोळे तयार करुन घेवू. त्यातला एक गोळा घेऊन हाताच्या साह्याने वाटी सारखा आकार करून त्यामध्ये एक ते दोन चमचे तयार मसाला भरा व उरलेल्या कणकेला चारही बाजूंनी उचलून बंद करून गोल गोल आकार देऊन थोडे चपटे करून घ्या. अशाप्रकारे सर्व लिट्टी तयार करून ठेवा.

आता गॅस ऑन करुन घ्या. त्यावर कुकर किंवा झाकण असलेले कोणतेही भांडे ठेवा प्रिहीट करून घ्या.नंतर त्यामध्ये तयार केलेल्या लिट्टी ठेवा.झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे बेक करून घ्या. अधून मधून लिट्टी पलटवत रहा.म्हणजे ती चांगली भाजलीतयार आहे आपली लिट्टी. गॅस बंद करा.आता आपली लिट्टी तुपामध्ये डिप करून घ्या. पेल्ट मध्ये काढून ठेवा.चोखा बनवण्याची कृती

चोखा बनविण्यासाठी वांग्याला तेल लावून गॅसवर भाजून घ्या.सोबतचं टोमॅटो भाजून घ्या.वांग्याचे व टोमॅटोचे साल काढून घ्या.आता भाजलेले वांगे आणि टोमॅटो ,सोबतच उकडलेले बटाटे हे सर्व एकत्र करा.आता चोख्यासाठीचे सगळे साहित्य एकत्र करा आणि सरसोचे तेल मिक्स करुन घ्या. वरील चला तयार झाली आपली लिट्टी चोखा रेसीपी.

Written By : Sakshi Jadhav

Litti Chokha Recipe
Tandoori Naan Recipe: घरच्या घरी तव्यावरच बनवा,परफेक्ट तंदूरी नान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com