ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही गोड पदार्थ किंवा नेवैद्य तुम्हाला थोड्या वेगळ्या स्टाईलने तयार करायचा असेल तर करा गोड थंडाई शेवया रेसिपी
१ कप शेवया, १ कप दूध, २-३ चमचे ताजी मलई, ४ चमचे साखर, ड्रायफ्रुट्स, १ टेबलस्पून दुधाची थंडाई, अर्धा चमचा वेलची पावडर
सर्वप्रथम शेवया घ्या. शेवया हाताने थोड्या बारिक करुन घ्या.
आता गॅस ऑन करुन त्यावर नॉनस्टीकचे भांडे ठेवा. त्याने शेव जास्त चिकटणार नाही.
आता बारिक केलेली शेव तूप घालून व्यवस्थित भाजून घ्या.
शेवया भाजल्यावर त्यात एक वाटी दूध आणि साखर त्यात अॅड करा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.२ मिनिटांनी एक चमचा थंडाई आणि मलई सुद्धा अॅड करा
शेवटी शेवयामध्ये वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स मिक्स करा. आता त्यावर ३ ते ४ मिनिटे झाकण ठेवा.
आता गॅस बंद करा आणि गरमागरम थंडाई शेवया रेसिपी सर्व्ह करा.
NEXT : फुलवंतीचा दरवळ बॉक्स ऑफिसवर पसरलाय का?