Toyota Solid State Battery Saam Tv
लाईफस्टाईल

Toyota Battery : टोयोटाची नवी कार करणार मार्केट जाम! फक्त १० मिनिटांत फुल चार्ज, मुंबईहून थेट दिल्ली गाठणार

Toyota Battery Specification : ही बॅटरी केवळ १० मिनिटात फुल चार्ज होऊन तब्बल १२०० किलोमीटर एवढी रेंज देईल असे सांगण्यात येत आहे.

कोमल दामुद्रे

Toyota Solid State Battery :

सणासुदीच्या काळात आपल्या घरासमोर देखील एखादे इलेक्ट्रिक वाहन असावे अशी प्रत्येकांची इच्छा असते. वाढत्या प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहायाला मिळत आहे. परंतु, यामध्ये देखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारा वेळ आणि कमी रेंज यामुळे ईव्हीकडे दुर्लक्ष देखील करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जपान वाहन कंपनी टोयोटा एका नव्या प्रकारची बॅटरी तयार करत आहे. ही बॅटरी केवळ १० मिनिटात फुल चार्ज होऊन तब्बल १२०० किलोमीटर एवढी रेंज देईल असे सांगण्यात येत आहे. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ईव्ही कधी खरेदी करता येणार?

माहितीनुसार कंपनी एक सॉलिड-स्टेट बॅटरी तयार करत आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज (Charge) होण्यासाठी अवघ्या १० मिनिटांचा वेळ घेईल. तसेच फुल चार्ज झाल्यानंतर ही ईव्ही १२०० किलोमीटर एवढी रेंज (Range) देईल. याची तयारी अंतिम टप्प्यात असून २०२७ -२८ सालापर्यंत याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

या बॅटरीच्या निर्मितीसाठी टोयोटाने इडेमित्सु या कंपनीशी करार देखील केला आहे. टेस्ला आणि बीवायडी सारख्या इलेक्ट्रिक (Electric) कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. अशातच हायब्रिड कार सेक्टरमध्ये या दोन्ही कंपन्यांपेक्षा अधिक पटीने टोयाटो पुढे आहे.

2. सॉलिड स्टेट बॅटरी म्हणजे काय?

बाजारात वापरल्या जाणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम- आयन बॅटरी सध्या वापरली जात आहे. मात्र लिथियम हा पदार्थ महाग असल्यामुळे या बॅटरींची किंमतही अधिक असते. सॉलिड स्टेट बॅटरीमध्ये वापरले जाणारे घटक हे घन स्वरुपात असतात. यामुळे या बॅटरीची स्टेबिलिटी आणि सुरक्षितता वाढेल असे कंपनीचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

Kopargaon News : बसच्या सीटखाली विद्यार्थ्यांला सापडले नोटांचे बंडल; मतपेट्या आणलेल्या बसमध्ये रक्कम सापडल्याने खळबळ

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT