टोयोटा ही कार उत्पादनातील मोठी कंपनी आहे. कंपनीने नुकतीच नवीन लँड क्रुझर प्राडो (Land Cruiser Prado)ही कार लाँच केली होती. या कारसोबतच कंपनीने नवीन छोट्या ऑफ-रोडर एसयूवीची घोषणा केली होती.
ही नवीन एसयूवी लँड क्रूझर प्राडो आणि लँड क्रूझर 300 सोबत लँड क्रुझर लाइन-अप करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार, या नवीन एसयूव्हीचे नाव टोयोटा लँड हॉपर असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या नवीन एसयूवीबद्दल.
टोयोटा लँड हॉपर
मीडिया रिपोर्टनुसार, नवीन एसयूवीला मार्केटच्या आधारावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे दिली जातील. नुकत्याच लाँच झालेल्या लँड क्रुझर प्राडोला अमेरिकेत लँड क्रुझर 250 म्हणून ओळखली जाते. या कंपनीने यावर्षी ऑगस्टमध्ये जपानी पेटंट ऑफिससोबत ट्रेडमार्क केले होते. त्यामुळे नवीन एसयूवीला जपानमध्ये 'लँड हॉपर' नावाने लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
लँड क्रूझर प्राडोच्या लाँच कार्यक्रमात, टोयोटाचे डिझाइन प्रमुख साइमन ह्मफ्रिज यांनी या मॉडेलची माहिती दिली. ही नवीन एसयूवी सामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. टोयोटा इतर बाजारपेठांसाठी वेगवेगळ्या नावाने मॉडेल सादर करण्याची तयारी करु शकते.
डिझाइन आणि पॉवरट्रेन
नवीन मॉडेलबाबात काही रिपोर्ट्स आले आहेत. यात टोयोटा त्याच्या नवीन कॉम्पॅक्ट क्रूझरसह इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करु शकते. या एसयूव्हीचा एक टीझर जारी करण्यात आला आहे. यात एक बॉक्स आणि अपराइट डिझाइन पाहायला मिळत आहे. या एसयूवीबाबत अधिक माहिती समोर आली नाहीये. एसयूव्हीमध्ये सी शेपमध्ये लाइट सिग्नेचर दिसू शकते.
लीक झालेल्या माहितीनुसार, या लँड हॉपर एसयूवीचा आकार कोरोला क्रॉस सारखा असण्याची शक्यता आहे. जो 4.4 मीटर लांब असणार आहे. कारच्या कॉनसेप्टमध्ये मोठा बदल असल्याचे दिसत आहे. या कारबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. ही कार या वर्षाच्या शेवटी बाजारात उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.