Tourism Saam TV
लाईफस्टाईल

Tourism : प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात 'या' ठिकाणी नक्की गेलं पाहिजे; वाचा बेस्ट प्लेस

Tourist Spots : पावसाळ्यात एखाद्या ट्रिपसाठी प्लान करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादी आणली आहे. या ठिकाणी तुम्ही एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

Ruchika Jadhav

पावसाळा सुरु झाला आहे. देशभरात सर्व शहरांत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. आता तुम्ही देखील पावसाळ्यात एखाद्या ट्रिपसाठी प्लान करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादी आणली आहे. या ठिकाणी तुम्ही एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

उदयपूर

तुम्ही दिल्ली किंवा दिल्लीच्या आसपासच्या शहरात राहत असाल तर राजस्थानमधील उदयपूर येथे नक्की भेट देऊ शकता. उदयपूरला रोमँटीक आणि मनमोहक शहरांपैकी एक शहर मानले जाते. येथे एकापेक्षा एक टूरीस्ट स्पॉट्स आहेत. येथे असलेलं लेक पॅलेस अगदीच डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. पावसाळ्यात येथे आल्याने राजस्थानच्या कडक उन्हापासून तुमचा नक्की बचाव होईल.

कसे जायचे?

उदयपूरमध्ये रेल्वे स्टेशन, बसस्थानक देखील आहे. तुम्हाला जो मार्ग उत्तम आणि योग्य वाटेल त्याने तुम्ही प्रवास करू शकता.

मनाली

दिल्लीपासून जवळ असलेलं आणखी एक ठिकाण म्हणजे मनाली. तुम्ही मित्र परिवार किंवा प्रियकरांसह देखील या ठिकाणाला भेट देऊ शकता. येथील थंडी आणि पर्वतरांगा कमालीच्या सुंदर आहेत. ट्रँकिंग, पॅराग्लाइडिंग, रिव्हर क्रॉसिंग अशा सर्व गोष्टी तुम्ही येथे करू शकता. नवी दिल्लीपासून हे ठिकाण ५३७ किलोमीटर अंतरावर आहे. दिल्लीपासून येथे पोहचण्यासाठी १० ते १२ तासांचा प्रवास करावा लागतो.

लोणावळा

मुंबई आणि पुणे शहरापासून जवळ असलेलं लोणावळा शहर पर्यटकांसाठी खास आहे. या शहरात पावसाळ्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. दरवर्षी पावसाळ्यात डॅम आणि धबधब्यांवर यामुळे मोठी गर्दी जमा होते. तुम्ही मुंबई आणि पुणे येथून लोणावळा स्टेशनला येऊ शकता. त्यानंतर येथील विविध ठिकाणांना भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT