Parliament Monsoon Session: 'उद्याचा अर्थसंकल्प देशाच्या स्वप्नांना बळ देईल', PM मोदींचे प्रतिपादन; विरोधकांना केलं खास आवाहन!

Parliament Monsoon Session 2024: आजच्या अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांना देशाला भक्कम बजेट देण्याचे आश्वासन दिले.
PM Narendra Modi: 'पक्षासाठी नाही देशासाठी लढूया', बजेटआधी PM मोदींचे विरोधकांना खास आवाहन
PM Narendra Modi Lok Sabha 2024 Saam Digital
Published On

दिल्ली, ता. २२ जुलै २०२४

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार असून आज अर्थमंत्री मोदी सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार करणार आहेत. आजच्या अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांना देशाला भक्कम बजेट देण्याचे आश्वासन देत देश वेगाने पुढे जात असल्याचे सांगितले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"आज श्रावणातील पहिला सोमवार. या शुभदिनी एक महत्त्वाचे सत्र सुरू होत आहे. मी देशवासियांना श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या शुभेच्छा देतो. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आज संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. हे एक सकारात्मक अधिवेशन व्हावे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

तसेच "60 वर्षांनंतर एखादे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येते आणि अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळतो ही अभिमानाची गोष्ट आहे. उद्या आपण जो अर्थसंकल्प सादर करणार आहोत तो अमृतकालचा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. आम्हाला पाच वर्षांची संधी मिळाली आहे, हा अर्थसंकल्प त्या पाच वर्षांसाठी आमची दिशा ठरवेल. हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नांना बळ देईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

PM Narendra Modi: 'पक्षासाठी नाही देशासाठी लढूया', बजेटआधी PM मोदींचे विरोधकांना खास आवाहन
Maharashtra Politics : महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकलाय; वाघनखांची उठाठेव कसली करताय, 'सामना'तून जहरी टीका

आज मी विरोधी पक्षाच्या खासदारांनाही आवाहन करू इच्छितो की, गेल्या जानेवारीपासून आपण जितकी क्षमता होती तितका लढा दिला. जनतेला जे काही सांगायचे होते ते मी सांगितले. पण आता ती वेळ संपली आहे. देशवासीयांनी आपला निकाल दिला आहे. आता निवडून आलेल्या खासदारांचे कर्तव्य देशातील जनतेसाठी आहे. आता पक्षापेक्षा देशासाठी लढण्याची जबाबदारी सर्व खासदारांची आहे.

PM Narendra Modi: 'पक्षासाठी नाही देशासाठी लढूया', बजेटआधी PM मोदींचे विरोधकांना खास आवाहन
Pune Crime: पुण्यात चाललयं तरी काय? चोरट्यांकडून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केला गोळीबार; नवले पुलाजवळ थरारक घटना!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com