प्रमोद जगताप, प्रतिनिधी
राजधानी दिल्लीमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार (३, ऑक्टोंबर) राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरुन गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी होती. ज्याचे केंद्र नेपाळमध्ये होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजधानी दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लखनौ, उत्तराखंड आणि नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले की, दुपारी २.५१ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी होती.
या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या भुकंपात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. डेहराडून, उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये लोक इमारतींमधून बाहेर धावले आणि बाहेर गर्दी दिसून आली. घरातील पंखे, फर्निचर थरथरायला लागले आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, या भूकंपामध्ये जिवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत असून याबाबतची माहिती गोळा केली जात आहे. (Latest Marathi News)
भविष्यवाणी ठरली खरी..
नेदरलँड्सच्या सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGEOS) च्या संशोधकांनी पाकिस्तान आणि आसपासच्या भागात वातावरणातील चढउतार दिसून आले आहेत, जे येत्या काही दिवसांत तीव्र भूकंपाचे संकेत देतात... अशी शक्यता वर्तवली होती. तसेच यासाठी त्यांनी १ ते ३ ऑक्टोबर हा काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.