Latur Tourism Saam TV
लाईफस्टाईल

Latur Tourism : अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घेण्यासाठी लातूरमधील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Latur Tourist Places : हिवळ्यात फिरण्याचा प्लान करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी लातूरमधील काही प्रसिद्ध आणि खास ठिकाणे शोधली आहेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

प्रत्येकालाच कुठेना कुठे तरी फिरायला जायचं असतं. त्याचबरोबर अनेक प्लानही तयार होत असतात. या प्लानमध्ये कोणत्या महिन्यात कोणत्या ठिकाणी भेट द्यायला जायचं याबाबद नेहमी चर्चा सुरु होत असते. पावसाळा संपला असून आता हिवाळा सुरू होत आहे. त्यामुळे हिवाळ्यात फिरण्यासाठी आम्ही लातूरमधील काही सुंदर पिकनीक स्पॉट तुमच्यासाठी शोधले आहेत.

महाराष्ट्रातील लातूर शहराला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळ्याचा महिना आहे. लातूरच्या प्रेक्षणीय स्थळांचा अनुभव घेण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा काळ योग्य आहे. या लातूर जिल्ह्यात आपल्याला अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळतील. लातूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभल्याने हे शहर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या शहराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. जर तुम्ही पण लातूरच्या पर्यटन स्थळांना भेट देणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे.

गंज गोलाई मार्केट

लातूरमधील गंज गोलाई मार्केट ही एक बाजारपेठ आहे. या बाजारपोठेत आपल्याला देवी जगदंबेचे मंदिर पाहायला मिळेल. या गंज गोलाई मार्केटमध्ये पंधरा रस्ते एका केंद्रबिंदूकडे एकत्रित होतात. या बाजारपेठेची रचना फैयाजुद्दीन नावाच्या नगर नियोजकाने केली आहे. गंज गोलाई मार्केटमध्ये आपल्याला सर्व प्रकारची दुकाने पाहायला मिळतील. पर्यटकांच्या खरेदीसाठी हे बाजारपेठ योग्य ठरणार आहे.

नाना नानी पार्क

लातूर शहरातील नाना नानी पार्क खूप प्रसिद्ध आहे. लातूरमधील अनेक पर्यटकांचे हे एक आवडते निवांत ठिकाण आहे. या पार्कला विलासराव देशमुख या नावानेही ओळखतात. हे पार्क नगरपालिकेच्या कार्यालयाजवळ आहे. पर्यटकांसाठी या उद्यानाला भेट देण्याची उत्तम वेळ पहाटे ५:०० ते संध्याकाळी ९:०० वाजेपर्यंत आहे. नाना नानी पार्कने त्याच्या आनंददायी आणि शांत वातावरणामुळे सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

सिध्देश्वर रत्नेश्वर मंदिर

लातूरमधील हे सुप्रसिध्द मंदिर सिध्देश्वराचे भक्त असणाऱ्या राजा ताम्रध्वजने बांधले आहे. लातूर शहरापासून सिध्देश्वर आणि रत्नेश्वर मंदिर दोन किमी अंतरावर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ सकाळी ५ : ३० ते संध्याकाळी ८ : ०० वाजेपर्यंत आहे. या मंदिरात आपल्याला पौरणिक प्राणी आणि अनेक कोरीवकाम पाहायला मिळेल.

श्री अष्टविनायक मंदिर

लातूर शहरातील अष्टविनायक मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले आहे. या मंदिराच्या सुंदर रचनाकृतीमुळे पर्यटकांचे अष्टविनायक मंदिर आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला भिंतीमध्ये आठ गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतील. त्यानंतर संगमरवरी दगडात कोरलेली चार फूट उंचीची गणेश मूर्ती पाहायला मिळेल. या मंदिराच्या दोन्ही बाजूला कारंजेची बाग असल्याने ती बाग मंदिराची अजून शोभा वाढवत आहे.

औसा किल्ला

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील औसा किल्ला एक अस्पष्ट इतिहास असलेला आहे. हा किल्ला खचलेल्या जमिनीच्या पातळीत आहे. या किल्याला वेगवेगळी तेरा नावे देण्यात आली होती. पण आता या किल्यासाठी शेवटचे नाव औसा ठरवले आहे. या किल्याचा उपयोग जास्त अंतरावरुन येणाऱ्या सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. या ऐतिहासिक किल्याचे महत्तव जाणून घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट द्यायला जात असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT