हिवाळ्यात नेहमीच्या लोणावळा, खंडाळा या हिल स्टेशनला भेट देऊन कंटाळा आला असेल तर, महाराष्ट्रातील चिखलदरा (Chikhaldara ) या हिल स्टेशनला भेट द्या. चिखलदऱ्याचे सौंदर्य आणि तेथील पर्यटन स्थळे गोव्याचे सौंदर्य तुम्हाला विसरायला भाग पाडेल. चिखलदऱ्याला सुंदर दृश्यांचा नजारा पाहायला मिळतो. चिखलदऱ्यातील काही सुंदर ठिकाणांची यादी नोट करून घ्या.
तुम्हाला जर या पिकनिकमध्ये मुलांना प्राणी-पक्षांची दुनिया जवळून दाखवायची असेल तर गुगामल राष्ट्रीय उद्यानाला आवर्जून भेट द्या. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीवांसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला हरीण, बिबट्या, सिंह यांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतील. प्राणी प्रेमींसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
चिखलदरा येथील भीमकुंड पॉइंट हा पर्यटकांचे आकर्षण आहे. भीमकुंड पॉइंट म्हणजे डोंगराच्या मधोमध एक मोठा तलाव होय. ज्याला भीमकुंड नावाने ओळखले जाते. असे बोले जाते की, हे ठिकाण ब्रिटिश काळापासून येथे आहे.
चिखलदऱ्यातील सर्वात निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पंचबोल पॉइंट होय. पंचबोल पॉइंटवरून तुम्हाला डोंगराळ दृश्य अनुभवायला मिळतात. हिवाळ्यात दाट धुक्याची चादर येथे पाहायला मिळते. हे ठिकाण जोडीदारासोबत फिरण्यासाठी खास आहे. पंचबोल पॉइंटच्या आजूबाजूला कॉफीचे मळे देखील आहे.
चिखलदऱ्याला स्वस्तात मस्त जायचे असेल तर, रेल्वेने प्रवास करा. तुम्ही अमरावती स्टेशनला उतरून पुढे रिक्षा किंवा बसने चिखलदऱ्याला जाऊ शकता. रेल्वेचा प्रवास आरामदायी होईल. चिखलदऱ्याला आल्यावर येथे राहण्यासाठी हॉटेल्सची उत्तम सोय आहे. तसेच तेथील फूडही खूप टेस्टी आहे. तुम्हाला येथे महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.