Astrology Tips Saam TV
लाईफस्टाईल

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Marriage Problems : वय उलटून चाललं तरी लग्न जुळत नसेल तर ज्योतिशास्त्रानुसार पुढील उपाय तुम्ही करून पाहू शकता. हे उपाय केल्याने लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होण्याची शक्यता असते.

Ruchika Jadhav

लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस. प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नासाठी एक्साइटेड असतात. मात्र काही मुलांना किंवा मुलींना कुंडली दोष असल्याने काही केल्या त्यांचे लग्न जुळत नाही. त्यामुळे आज लग्न जुळवण्यासाठी आम्ही वास्तुशास्त्रातील काही उपाय शोधले आहेत. त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

लग्नाचं वय निधून जात आहे, स्थळ आलं तरी ते पसंत पडत नाहीये. समोरच्या व्यक्तीच्या भरमसाठ अपेक्षा आहेत, लग्न ठरता ठरता तुटत आहे अशा सर्वांसाठी नेहमी नशीब नाही तर ग्रहांचा देखील दोष असण्याची शक्यता असते. पुढील उपय करताच तुम्हाला आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्यास मदत होईल.

टाळं

लग्न ठरत नाही म्हणजे नशि‍बाचं टाळं उघडत नाही असं होतं. लग्नाच्या बाबतीत तुमचंही नशीबाचं टाळ उघडत नसेल तर तुम्ही पुढील उपाय करू शकता. त्यासाठी एक लोखंडी टाळा उशीखाली ठेवून झोपा. लोखंड नकारात्मक ऊर्जा खेचून घेते त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. हा उपाय किंमान २१ दिवस करावा लागेल.

हळद

ज्योतिषशास्त्रानुसार, हळद फार भाग्यवान समजली जाते. तुम्ही अंघोळीच्या पाण्यात हळद मिक्स करू शकता. लग्न ठरत नसल्यास अशा पाण्याने आंघोळ करावी. याने मार्गातील सर्व अडचणींचा नायनाट होतो आणि वाट सापडते. हळद आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे.

गायीची सेवा

गायीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. गायीमध्ये ३३ कोटी देव असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे गायीची मनोभावे सेवा केली पाहिजे. गायीची सेवा करताना तुम्ही तिच्यासाठी हरभरा, गूळ आणि कव्हाचे पीठ एकत्र मिक्स करून गायीला खाण्यासाठी देऊ शकता. याचे सेवन केल्याने गाय माता तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT