Panchang Today saam tv
लाईफस्टाईल

Panchang Today: आज शुक्र प्रदोष व्रताचा संयोग! मिथुनसह चार राशींसाठी लाभदायक दिवस

Shukra Pradosh Vrat today: आज शुक्र प्रदोष व्रताचे योग निर्माण झाले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या व्रतामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज ३० जानेवारी असून माघ शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आणि शुक्रवार आहे. म्हणजेच शुक्र प्रदोष व्रत आहे. शुक्र प्रदोष व्रत विवाहातील अडथळे दूर करण्यास मदत करतं. शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी, आर्द्रा नक्षत्र आणि वैधृति योगाचा प्रभाव आज दुपारपर्यंत राहणार आहे.

चंद्र मिथुन राशीत असल्यामुळे संवाद, चर्चा, माहिती देवाणघेवाण आणि बौद्धिक कामांकडे कल राहणार आहे. संयम आणि विवेक ठेवून केलेली कामं आज अधिक परिणामकारक ठरू शकतात. आजचं पंचांग, शुभ-अशुभ मुहूर्त आणि चार राशींसाठी विशेष फलित सविस्तर दिले आहे.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल द्वादशी

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • वार: शुक्रवार

  • नक्षत्र: आर्द्रा

  • योग: वैधृति (सायंकाळी 04:47:09 PM पर्यंत)

  • करण: बालव

  • चंद्र राशि: मिथुन

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:49:37 AM

  • सूर्यास्त: 05:45:37 PM

  • चंद्रोदय: 02:56:36 PM

  • चंद्रास्त: 04:30:02 AM (पुढील दिवस)

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): माघ

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त:

11:56:00 AM ते 12:38:00 PM

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 10:55:37 AM ते 12:17:37 PM

यमघंट काल: 03:01:37 PM ते 04:23:37 PM

गुलिकाल: 08:11:38 AM ते 09:33:38 AM

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी असणार चांगला?

मिथुन रास

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे तुमचं संवाद कौशल्य वाढणार आहे. महत्त्वाच्या चर्चा, मुलाखत किंवा बैठका यशस्वी ठरू शकतात. नवीन योजनांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे.

तूळ राशि

नातेसंबंधात समतोल आणि समजूतदारपणा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळणार आहे.

कुंभ रास

नवीन विचार आणि वेगळ्या दृष्टिकोनामुळे फायदा होणार आहे. तांत्रिक, बौद्धिक कामात यश मिळू शकणार आहे. मित्रमंडळींचा पाठिंबा लाभणार आहे.

कन्या रास

नियोजन आणि बारकाव्यांकडे लक्ष देण्याची क्षमता वाढणार आहे. कामातील चुका टाळतील आणि जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडणार आहे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेता येतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! १२ फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता

Extramarital affairs women: ना नवऱ्याचं टेन्शन...ना समाजाची भीती; 35-40 वयोगटातील महिला का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर?

SCROLL FOR NEXT