Kajal Wearing Tips in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Kajal Tips: डोळ्यांना काजळ लावताना पसरते? या टिप्स फॉलो करा, डोळे दिसतील अधिक सुंदर

Tips To Avoid Kajal From Smudging: चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहाते ते डोळ्यांमुळे. डोळे सुंदर दिसण्यासाठी आपण त्यावर अनेक गोष्टी लावण्याचा प्रयत्न करतो. अगदी लहानपणापासून डोळे सुंदर दिसावे यासाठी आई-आज्जी आपल्याला डोळ्यांना काजळ लावत असते. ज्यामुळे डोळे छान आणि टपोरे दिसतात.

कोमल दामुद्रे

चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहाते ते डोळ्यांमुळे. डोळे सुंदर दिसण्यासाठी आपण त्यावर अनेक गोष्टी लावण्याचा प्रयत्न करतो. अगदी लहानपणापासून डोळे सुंदर दिसावे यासाठी आई-आज्जी आपल्याला डोळ्यांना काजळ लावत असते. ज्यामुळे डोळे छान आणि टपोरे दिसतात.

हल्ली काजळचे नवीन ब्रॅण्ड आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. महिलांच्या पर्समध्ये काजळ सहज आपल्याला मिळते. परंतु, अनेकदा काजळ लावल्यानंतर ते डोळ्यांखाली पसरते ज्यामुळे डोळ्यांचा खालचा भाग काळा दिसू लागतो. पसरलेले काजळ नीट कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. काजळ कसे लावायचे, ते पसरल्यानंतर डोळ्यांची (Eye) काळजी कशी घ्यायची जाणून घेऊया.

1. डोळ्यांखाली पसरलेले काजळ काढण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करु शकता. हे त्वचेला (Skin) हायड्रेट करण्याचे काम करते. याशिवाय खोबऱ्याचे तेलही फायदेशीर आहे. कापसाचा गोळा आणि तेलाच्या सहाय्याने तुम्ही डोळ्यांखाली पसरलेले काजळ काढू शकता.

2. बेबी ऑइलच्या मदतीनेही काजळ काढता येते. यासाठी तुम्हाला कापसाचा गोळा बेबी ऑइलमध्ये टाकून हलक्या हाताने डोळ्यांभोवती पसरवून काढून टाका. मेकअप रिमूव्हर काजळ काढून टाकण्यास मदत करते.

3. काजळ काढताना डोळे अजिबात चोळू नका. यामुळे डोळ्यांवर सूज येऊ शकते. आपले डोळे अतिसंवेदनशील असतात. त्यामुळे या गोष्टी आधी हातावर वापरुन मग डोळ्यांवर वापरा.

4. मेकअप रिमूव्हर वापरण्यापूर्वी त्याची तारीख तपासा. काही महिलांना या गोष्टींची ऍलर्जी असू शकते. त्यासाठी चांगल्या ब्रॅण्डचे मेकअप रिमूव्हर वापरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT