Headache yandex
लाईफस्टाईल

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

डोके आणि मानेचा कर्करोग हा विभिन्न प्रकारचा तोंड, घसा, सायनस आणि लाळ ग्रंथी यासारख्या विविध अवयवांमध्ये होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोके आणि मानेचा कर्करोग हा विभिन्न प्रकारचा तोंड, घसा, सायनस आणि लाळ ग्रंथी यासारख्या विविध अवयवांमध्ये होतो. आपली जीवनशैली सुधारून आणि सावधगिरी बाळगून यापैकी बहुतेक कर्करोग टाळता येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला डोके आणि मानेच्या पाच सर्वात सामान्य कर्करोगांबद्दल सांगणार आहोत. यासोबतच त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे उपायही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डोके आणि मानेचे कर्करोग शरीराच्या त्या भागांमध्ये होतात ज्यांचा आपण दैनंदिन जीवनात खूप वापर करतो. जसे तोंड, घसा, आवाज, सायनस आणि लाळ ग्रंथी. आपल्या जीवनशैलीत काही बदल करून आणि खबरदारी घेतल्यास यापैकी अनेक कर्करोग टाळता येतात. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि आपल्या काही सवयी, जसे की तंबाखू पिणे किंवा मद्यपान करणे, या प्रकारच्या कर्करोगास प्रोत्साहन देतात. earth.com च्या मते, खराब वायू प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. आज आपण डोके आणि मानेच्या पाच सर्वात सामान्य कर्करोगांबद्दल जाणून घेणार आहोत.

तोंडाचा कर्करोग

तोंडाच्या कर्करोगमध्ये आतील भागांवर, जसे की ओठ, जीभ, हिरड्या आणि गालांवर परिणाम होतो. तंबाखूचे सेवन, अति मद्यपान आणि तोंडाची खराब स्वच्छता ही यामागची प्रमुख कारणे असू शकतात. हे टाळण्यासाठी तंबाखू आणि दारू टाळली पाहिजे. तसेच, चांगल्या मौखिक आरोग्यासाठी, एखाद्याने दररोज ब्रश आणि फ्लॉस केला पाहिजे. तुम्ही वेळोवेळी दंतवैद्याकडे जाऊन दात तपासू शकता. याशिवाय पान मसाला, गुटखा, धूम्रपान टाळणेही महत्त्वाचे आहे.

लाळ ग्रंथीचा कर्करोग

लाळ ग्रंथींचा कर्करोग हा एक घातक ट्यूमर आहे जो लाळ ग्रंथींमध्ये होतो. हा एक दुर्मिळ आजार आहे आणि केवळ सहा टक्के डोके आणि मान कर्करोगाशी संबंधित असतो. लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर त्याचा परिणाम होतो. लाळ ग्रंथीचा कर्करोग रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. तथापि, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या प्रकार टाळून कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. यासोबतच कुटुंबातील कर्करोगाच्या इतिहासाबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घशाचा कर्करोग

हा कर्करोग घशात होतो आणि नासोफरीनक्स, ऑरोफरीनक्स किंवा हायपोफरीनक्सवर परिणाम करतो. त्याच्या जोखमींमध्ये तंबाखू, अल्कोहोल आणि एचपीव्ही संसर्ग यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर राहा. दारू पिण्यावर नियंत्रण ठेवा. एचपीव्ही लसीचा देखील विचार करा, ज्यामुळे एचपीव्ही-संबंधित घशाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

सायनस आणि नाकाचा कर्करोग

हा दुर्मिळ कर्करोग सायनस आणि नाकांवर परिणाम करतो. लाकूड भुसा आणि काही रसायनांच्या संपर्कात आल्याने धोका वाढतो. हे टाळण्यासाठी हानिकारक रसायनांपासून दूर राहा. चांगल्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा.

स्वरयंत्राचा कर्करोग

स्वरयंत्राचा कर्करोग हा धूम्रपान करणाऱ्यांना आणि जास्त मद्यपान करणाऱ्यांना होतो. याशिवाय, हानिकारक धुराचा संपर्क हे देखील एक प्रमुख कारण आहे. हे टाळण्यासाठी, धूम्रपान सोडा, दारू पिऊ नका आणि धोकादायक धुराच्या वातावरणात मास्क घाला.

Edited by- Archana Chavan

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT