Pune businessman kills wife and burns body inspired by Drishyam : अजय देवगण, तब्बू आणि श्रेया सरन यांचा दृश्यम चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. याच क्राइम थ्रिलर चित्रपटाची आठवण करूण देणारे प्रकरण पुण्याच्या वारजेमध्ये घडलेय. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला म्हणून पुण्यातील एका बिझनेसमनने बायकोची निर्घृण हत्या केली. हत्याचे सर्व पुरावे नष्ट केले अन् पोलिसात बायको हरवल्याची तक्रार केली. पोलिसांकडून तात्काळ या प्रकरणाचा शोध घेतला जात होता. पण काही पुरावे सापडत नव्हते. पण पोलिसांना तक्रार करणाऱ्या नवऱ्यावरच संशय आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् भंडाफोड झाला.
आरोपीचे नाव समीर पंजाबराव जाधव असे आहे. तर मृत महिलेचे नाव अंजली समीर जाधव असे आहे. समीर याने दृश्यम चित्रपट आणि इतर क्राइम थ्रिलर चित्रट, कांदबऱ्यातून प्रेरणा घेतली अन् बायकोचा काटा काढला. त्यानंतर शांत डोक्याने पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्याने तिची राखही पोलिसांना मिळू नये, असा प्लॅन आखला होता. पण पोलिसांनी आरोपीचा भंडाफोड करत कोडे उलगडले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली. २६ ऑक्टोबर रोजी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील शिंदेवाडी परिसरातील गोगलवाडी फाटा येथील एका गोदामात समीरने बायकोचा खून केला.
समीर हा बिझनेसमन असून तो फॅब्रिकेशनचे काम करतो. शिवणे परिसरात त्याचे एक गॅरेज आहे. मृत पत्नी अंजली एका खासगी शाळेत शिक्षिका होती. समीर याला अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता. मोबाइलमधील चॅटिंगवरून त्याने अनेकदा तिच्यावर अनैतिक संबंधांचे आरोपही केले. रागाच्या भरात समीरने शांत डोक्याने बायकोच्या हत्येचा कट रचला. त्याने शिवापूरमध्ये एक गोदाम भाडेतत्त्वावर घेतले आणि तिथे लोखंडी भट्टी तयार केली. २६ ऑक्टोबर रोजी पत्नीला फिरायला म्हणून घराबाहेर नेले. दिवसभर पत्नीसोबत वेळ घालवला. भेळही खाऊ घातली. त्यानंतर पत्नी अंजलीला तो त्या गोदामात नेऊ गेला. त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह लोखंडी भट्टीमध्ये जाळला. त्या मृतदेहाची राख त्याने नदीत टाकून दिली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसात गेला अन् मुंबई-बंगळुरू हायवेवर पत्नी हरवल्याची तक्रार दिली.
पोलिसांना समीर याच्या जबाबामध्ये वारंवार बदल जाणवला. तो जबाब बदलत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी २६ तारखेचे सीसीटीव्ही फुटेच तपासले. त्यामध्ये पत्नी अंजली आणि आरोपी समीर दिसून आले. पोलिसांनी समीरला खाकी दाखवली, त्यानंतर त्याने सगळे काही सांगितले अन् हत्येची कबूली दिली. आरोपी समीरने हा बायकोला संपवण्यासाठी शांत डोक्याने महिनाभर प्लान आखला. खून केल्यानंतर वाचण्यासाठी काय काय करायचे, हे त्याने बारकाईने पाहिले अन् पत्नीचा जीव घेतला. त्यानंतर राख नदीच्या पाण्यात फेकली. लोखंडी पेटी भंगारात विकली. त्यानंतर पत्नी हरवल्याची तक्रार दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३ अंतर्गत हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.