New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

Pune News : पुणे ते बंगळुर दरम्यान वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ४२ हजार कोटींचा सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प मंजूर. महाराष्ट्रात २०६ किमी लांबीचा हा महामार्ग तीन वर्षांत पूर्ण होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान
Pune NewsSaam tv
Published On
Summary

पुणेकरांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका देणारा सहापदरी महामार्ग प्रकल्प

संपूर्ण महामार्ग ६९९ किमी असून, महाराष्ट्रातील भाग २०६ किमी लांबीचा आहे

या प्रकल्पावर ४२ हजार कोटींचा खर्च, तीन वर्षांत पूर्ण होणार

प्रवाशांना वेळेची बचत आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणेकरांची वाहतूक कोंडीतुन सुटका करण्यासाठी सहापदरी रस्त्याचा नवा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. सध्याच्या पुणे ते बेंगळुरू महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे ते बेंगळुरू हा ग्रीनफिल्ड महामार्ग विकसित करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केले आहे. त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हा संपूर्ण मार्ग ६९९ किलो मीटरचा असून, त्याची महाराष्ट्रातील लांबी २०६ किलो मीटरची आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर हा सहापदरी रस्ता तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुणे शहराभोवती रिंग रोड साकारण्यात येत असून, त्यापाठोपाठ पुणे ते छत्रपती संभाजीनगरदरम्यानही नव्या महामार्गाचे काम लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. सध्याच्या पुणे बंगळुरू महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने पर्यायी मार्गाची गरज लक्षात घेऊन नव्या मार्गासाठी प्रकल्प निश्चित करण्यात आला आहे. या नव्या महामार्गासाठी सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान
EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

पुणे - बंगळुर या महामागांपैकी महाराष्ट्राच्या हद्दीत २०६ किमी लांबीचा रस्ता आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केल्या जाणाऱ्या वर्तुळाकार मार्गावरील खोपी येथून या नव्या रिंग रोडची सुरुवात होणार आहे. पुणे ते बंगळुर या महामार्गादरम्यान पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावरील उर्से ते सातारा रस्त्यावरील केळवडे हा पुणे रिंग रोडचा भाग आहे. त्याचे MSRDC करत आहे. हा रिंग रोडचा भागसुद्धा पुणे ते बंगळुर या नवीन ग्रीन फिल्ड महामार्गाचा भाग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान
Shocking News : सोशल मीडियावरील मित्राला भेटायला गेली अन् विपरित घडलं, ७ वीच्या मुलीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार

या प्रकल्पा दरम्यानच्या नव्या महामार्गांवरून प्रतितास १२० किमी वेगाने वाहने जाऊ शकणार आहेत. त्यामुळे अविकसित क्षेत्रामधील आर्थिक विकासाला चालना मिळेल. या महामार्गावर पुणे आणि बंगळूर शहरांजवळ पाच किमी लांबीची तातडीचे इमर्जन्सी एअरस्ट्रिप (हेलीपॅड) तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्ग जवळच्या टोलिंग प्रणालीसह; तसेच ग्रेड सेपरेटेड इंटरचेंजसह जोडण्यात येतील. दरम्यान या सहा पदरी प्रक्रल्पामुळे प्रवाशांचा वेळ असणार असून वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com