Alcohol Safety, Tips for safe drinking
Alcohol Safety, Tips for safe drinking  Saam Tv
लाईफस्टाईल

Tips for safe drinking : मद्यपानाचे सेवन घेऊ शकतो तुमचा जीव, वेळीच स्वत: ला रोखण्यासाठी हे उपाय करा

कोमल दामुद्रे

Tips for safe drinking : मद्यपानाच्या नुकसानाबद्दल डॉक्टर आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. डॉक्टरांचे (Doctor) असे म्हणे आहे की, आपले शरीर हे एका वेळी एकच पेय पचवू शकते व दिवसाला किमान ३ पेयाचे सेवन केल्यास ते पचवण्याचे कार्य करु शकते परंतु, त्यापेक्षा जास्त ड्रिंक केल्यास ते पचणार नाही.

ज्यादिवसापासून आपण मद्यपानाचे सेवन करण्यास सुरुवात करु तेव्हा पासून त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात होईल. मद्यपान करणाऱ्यामध्ये काही वेळा लगेच परिणाम दिसून येतात तर काहीवेळेस अधिक उशीर लागतो.

काही लोक कमी प्रमाणात त्याचे सेवन करतात तर काही इतके पिताता की, त्यांना त्या गोष्टीचे भान नसते. जर आपण मद्यपानाचे सेवन करत असू आणि आता ती आपल्या काही अंशी सोडवायची असेल तर आपण हे उपाय करुन पहायला हवे.

१. मद्यपानाचे सेवन किती अंशी असायला हवे

पार्टी असो किंवा मित्रांसोबत मस्ती असो, बरेच लोक अमर्यादित दारू पितात, त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागतो. healthdirect.gov.au नुसार, प्रौढांनी मद्यपान टाळण्यासाठी आठवड्यातून १० पेक्षा जास्त पेये आणि दिवसातून चार पेये पिऊ नये. प्रमाणित पेयाचा आकार ३३० मिली बिअर आणि ३० मिली हार्ड अल्कोहोल (व्हिस्की, जिन इ.)आणि १५० मिली वाइन (लाल आणि पांढरा) असतो. एका ड्रिंकमध्ये सुमारे १० ग्रॅम इथेनॉल (अल्कोहोल) असते.

शरीर एका तासात यावर जलद गतीने प्रक्रिया करते. त्यासाठी त्याचे सेवन प्रमाणात असायला हवे. जर एखाद्याने दररोज निर्धारित प्रमाणात मद्यपान केले तर ते अपघात, शारीरिक हानी किंवा हँगओव्हर होऊ शकते. याउलट, जर कोणी दररोज जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल तर त्याला हृदय, कर्करोग, यकृत, किडनी किंवा मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात.

२. प्यायच्या आधी आणि प्यायच्या वेळी काहीतरी खा

अल्कोहोल तुमच्या पोटातून आणि लहान आतड्यातून रक्तप्रवाहात जाते. जेव्हा तुम्ही अल्कोहोल पिण्यास सुरुवात करता आणि जर पोट रिकामे असेल तर अल्कोहोल रक्तप्रवाहात वेगाने जाईल. यामुळे, शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणून मद्यपान करण्यापूर्वी आणि मद्यपान करताना, नक्कीच काहीतरी खा. दारू पिण्यापूर्वी भरपूर पाणी (Water) प्या, खारट स्नॅक्स खाणे टाळा. मखाने, ड्रायफ्रुट्स, कोशिंबीर, शेंगदाणे, पनीर हे वाइनसोबत किंवा त्यापूर्वी खाऊ शकतात.

३. एका तासात एकच पेय प्या

शरीर प्रति तास फक्त एकच पेय प्रक्रिया करू शकते. पण जर तुम्ही जास्त लवकर दारू प्यायले तर शरीरात बीएसी जास्त प्रमाणात होईल आणि शरीराला जास्त त्रास होईल. म्हणून एका तासात प्रमाणित पेयापेक्षा जास्त न पिण्याचा प्रयत्न करा.

४. मद्यपान करताना बेट लावू नका

तुम्ही पाहिलेच असेल की अनेक जण दारू पिऊन काही ना काही बेट लावतात. त्यात काही जण एकाच वेळी सगळी बाटली पूर्ण खाली करतात तर काही त्यात बेट लावतात. असे करणे शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते. म्हणून, मद्यपान करताना, शक्य तितक्या लवकर खेळ, स्कोपिंग रेस किंवा अशी कोणतीही क्रियाकलाप टाळा ज्यामुळे तुम्हाला अधिक मद्य प्यावे लागते. एनर्जी ड्रिंक्समध्ये अल्कोहोल मिक्स करू नका कारण यामुळे तुम्ही जास्त प्यावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT