Improve Sleep Quality : तुम्हाला ही रात्रीच्यावेळी झोप येत नाही ? आपल्या जीवनशैलीत 'हे' बदल आजच करा

रात्री झोप न येणे हे आपल्या शरीरासाठी अधिक नुकसानकारक असते.
Improve Sleep Quality
Improve Sleep QualitySaam Tv

Improve Sleep Quality : आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण सगळेच सतत धावपळीत जगत असतो. दिवसभर काम व चिंतेमुळे आपल्याला थकवा येतो. थकवा काढण्यासाठी आपल्या झोप घेणे आवश्यक आहे.

काहीवेळेस आपण कितीही दमलेलो असलो तरी आपल्याला झोप येत नाही. झोपण्याचा कितीही प्रयत्न केल्यामुळे अस्वस्थ वाटू लागते. झोप न झाल्यामुळे आपला येणारा दिवस हा कंटाळवाणा असतो.

Improve Sleep Quality
Health Tips : रात्री झोपेत अचानक भूक लागते ? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच व्हा सावधान !

रात्री झोप न येणे हे आपल्या शरीरासाठी अधिक नुकसानकारक असते. चांगली झोप घेणे हे आपल्या आरोग्यासाठी अधिक चांगले असते. आपली झोप न झाल्यास आपण दिवसभर थकलेले वाटू परंतु, झोप न येण्याचे कारण आपण दिवसभरात करणाऱ्या चुका. त्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या जीवनशैलीत अनेक बदल करायला हवे. जाणून घेऊया त्याबद्दल

चांगल्या झोपेसाठी करा आपल्या जीवनशैलीत हे बदल -

१. कोवळ्या उन्हात काही काळ घालवा -

Morning Walk
Morning WalkCanva

चांगल्या झोपेसाठी, शरीराला ड जीवनसत्त्वाची (Vitamins) अधिक गरज असते. त्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हाने आपण दिवसाची सुरुवात करायला हवी. असे केल्याने मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या टळली जाऊ शकते.

Improve Sleep Quality
Stomach Cancer : सतत पोट दुखतयं ? 'ही' लक्षणे तर दिसत नाही ना, असू शकतो पोटाचा कर्करोग

२. पायाला तुपाने मसाज करा-

Foot massage
Foot massageCanva

रात्री झोप न येत असल्यास झोपण्याच्या ३० मिनिटाआधी कोमट तुपाने तळपायाची मालिश करावी. असे केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला त्यानंतर झोपही चांगली लागेल.

३. रात्रीच्या जेवणात प्रथिनेयुक्त पदार्थ खा

Protein Food
Protein FoodCanva

प्रथिनेयुक्त पदार्थ झोपेची गुणवत्ता सुधारण्याचे काम करतात. त्यांचे सेवन केल्याने शरीरात चांगली झोपेचे संप्रेरक तयार होतात आणि त्यामुळे रात्री चांगली झोप येते.

४. संध्याकाळनंतर चहा-कॉफी पिऊ नका-

Don't Drink Tea and Coffee
Don't Drink Tea and CoffeeCanva

चहा किंवा कॉफीमध्ये (Coffee) कॅफिन असते. जे तुमच्या झोपेमध्ये अडथळा आणण्याचे काम करतात आणि शरीरात अस्वस्थता निर्माण करतात, त्यामुळे संध्याकाळनंतर चहा किंवा कॉफी पिऊ नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com