Thyroid Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Thyroid Disease: थायरॉईड आणि लठ्ठपणा - एक न उलगडणारे कोड

कोमल दामुद्रे

Thyroid Affect Weight :

हायपोथायरॉईडीझम ही एक अशी स्थिती आहे जिथे थायरॉईड ग्रंथी पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार करण्यात अपयशी ठरते ज्यामुळे थायरॉईड उत्तेजक संप्रेरकाची (TSH) पातळी वाढते. हे वजन वाढणे तसेच लठ्ठपणाशी संबंधित आहे.

थायरॉईड संप्रेरके चयापचय प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हे खरे असले तरी, गंभीर लठ्ठपणास हायपोथायरॉईडीझम कारणीभूत ठरते. मात्र हायपोथायरॉईडीझम आणि लठ्ठपणा यासंबंधीत अनेक गैरसमजूती आहेत ज्या दूर करुन वास्तविकता जाणून घेणे गरजेचे आहे.

याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे मुंबईतील सैफी, नमाहा आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल्स, बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन, मेटाहेल- लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटरच्या डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी. त्या म्हणाल्या की, हायपोथायरॉईडीझममुळेच लठ्ठपणाची समस्या उद्भवते हा गैरसमज आहे.

कमी सक्रिय थायरॉईड चयापचय मंदावते, परिणामी काही अंशी वजन वाढू शकते, परंतु हेच लठ्ठपणाचे एकमेव कारण आहे असे नाही. खरं तर, हायपोथायरॉईडीझममुळे वजन वाढल्यास योग्य वैद्यकीय हस्तक्षेपाने प्रभावीपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते.

थायरॉईड संप्रेरक हे लठ्ठपणाचे कारणीभूत ठरते हा देखील एक गैरसमज आहे.जेव्हा डॉक्टर सांगतात की लठ्ठपणा ही न्यूरो-हार्मोनल समस्या आहे, तेव्हा त्याचा संबंध थायरॉईड संप्रेरकांशी असतो. तथापि, लठ्ठपणा ही अनुवांशिक, पर्यावरणीय, जीवनशैली (Lifestyle) आणि संप्रेरक बदलाने प्रभावित होणारी स्थिती आहे. थायरॉईड संप्रेरके हे चयापचय नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, तर इतर हार्मोन्स जसे की इन्सुलिन, लेप्टिन आणि घरेलिन देखील शारीरीक वजनावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक आहे.

हायपोथायरॉईडीझम असलेल्या प्रत्येकाचे वजन वाढते हा देखील एक गैरसमज आहे. हायपोथायरॉईडीझम असलेल्या प्रत्येकाचे वजन वाढतेच असे नाही. शारीरीक वजनावर हायपोथायरॉईडीझमचा प्रभाव ठरवण्यात आनुवंशिकता, जीवनशैली आणि एकूण आरोग्य (Health) यासारखे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.

हायपोथायरॉईडीझमवर उपचार केल्याने आपोआप वजन कमी होते. हायपोथायरॉईडीझमवर प्रभावी उपचार थायरॉईड संप्रेरक पातळी नियंत्रित करण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करू शकतात, परंतु ते प्रत्येकासाठी वजन कमी (Weight Loss) करण्याची हमी देत नाही. निरोगी वजन राखण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रित ठेवणे यासारखे घटक महत्त्वाचे ठरतात.

सामान्य थायरॉईडचे कार्य स्वयंचलित वजन नियंत्रणाच्या बरोबर असते. थायरॉईडचे कार्य सामान्य असलेल्या व्यक्ती देखील वजन व्यवस्थापनाशी संघर्ष करू शकतात. आनुवंशिकता, कॅलरीजयुक्त आहार, शारीरिक क्रियाकलाप आणि एकूण जीवनशैलीची निवड यासारखे घटक देखील शारीरीक वजनावर परिणाम करतात.

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार थायरॉईड संप्रेरकांमध्ये बदल, विशेषत: थायरॉईड-उत्तेजक संप्रेरक (टीएसएच) मध्ये वाढ, लठ्ठपणाच्या मुख्य कारणांपेक्षा कम परिणाम करते.

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार अगदी कमी वजन वाढणे देखील टीएसएचच्या लक्षणीय वाढीशी संबंधित आहे. हे यावर जोर देते की टीएसएच पातळीतील वाढ हा शरीराच्या वाढत्या वजनाचा परिणाम असू शकतो.

थायरॉईड कार्यामध्ये बदल सामान्यत: बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया किंवा हायपोकॅलरिक आहार यांसारख्या पर्यायांनी वजन कमी झाल्यानंतर सुधारतात हे अभ्यासातून सिध्द होते.

लठ्ठपणा आणि थायरॉईड कार्य यांच्यातील गुंतागुंतीनुसार वजन वाढणे आणि लठ्ठपणा हे एक प्रो-इंफ्लेमेटरी स्थिती निर्माण करू शकते.

थायरॉईडसंबंधीत अनेक गैरसमज दूर केल्याने व्यक्ती आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना थायरॉईड कार्य आणि शरीराचे वजन यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंबंधावर अधिक व्यापक आणि अचूक दृष्टीकोन स्वीकारण्यास मदत होते.

कमी सक्रिय थायरॉईड वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, परंतु सामान्यतः ते गंभीर लठ्ठपणाचे प्राथमिक कारण ठरत नाही. लठ्ठपणाचे स्वरूप ओळखणे आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी अधिक सूक्ष्म आणि प्रभावी दृष्टीकोन, जीवनशैलीतील बदल, वैद्यकीय हस्तक्षेप आणि वैयक्तिक आरोग्यासंबंधीत घटक समजून घेण्यास गरजेचे आहे. वजन वाढण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांच्या श्रेणीचा विचार त्यानुसार त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT