Cancer Symptoms Saam TV
लाईफस्टाईल

Uterus cancer: गर्भाशय कॅन्सरच्या निदानासाठी ‘ही’ टेस्ट फायदेशीर; योग्य वयात कधी करावी, तज्ज्ञांचा सल्ला

Uterus cancer test benefits: एचपीव्ही हे गर्भाशयाच्या कॅन्सर प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये एचपीव्ही -16 आणि एचपीव्ही -18 सारखे उच्च-जोखीम असलेले स्ट्रेन बहुतेक प्रकरणांसाठी जबाबदार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढतायत. यामध्ये कॅन्सरचं प्रमाणही वाढताना दिसून येतंय. यामध्ये महिलांमध्ये दिसून येणारा एक कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. गर्भाशयाच्या कॅन्सरचं लवकर निदान आणि प्रतिबंध करण्यासाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) चाचणी ही एक महत्त्वपूर्ण प्रगती मानली जाते.

एचपीव्ही हे गर्भाशयाच्या कॅन्सर प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये एचपीव्ही -16 आणि एचपीव्ही -18 सारखे उच्च-जोखीम असलेले स्ट्रेन बहुतेक प्रकरणांसाठी जबाबदार आहेत. याचाचणीमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेमध्ये उच्च-जोखीम असलेले एचपीव्ही असल्याचं लक्षात येतं. एचपीव्ही चाचणी मुळे पॅप स्मीअरद्वारे असामान्य पेशी दिसण्यापूर्वीच संभाव्य समस्या असल्याचे लक्षात येते.

गर्भाशयाच्या कॅन्सरचं अचूक निदान

न्यूबर्ग लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांच्या सांगण्यानुसार, पॅप स्मीअर्सच्या मध्ये असामान्य पेशीय बदल शोधतात तर एचपीव्ही चाचणीमध्ये या बदलांना कारणीभूत असलेले विषाणू आहेत का हे समजते. यामुळे महिलेला गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे का याचे निदान डॉक्टर अधिक अचूकतेने करू शकतात. एचपीव्ही चाचणी विशेषतः 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी उपयुक्त आहे, कारण सतत एचपीव्ही संसर्गामुळे या वयोगटात गर्भाशयाच्या कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

एचपीव्ही तपासणीचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे पेशीय असामान्यता निर्माण न करणाऱ्या संसर्गांना शोधण्याची क्षमता. यामुळे संभाव्य धोका लवकर लक्षात येतो जेणेकरून विशेष लक्ष देऊन कोल्पोस्कोपी किंवा कर्करोगापूर्वीच्या जखमांवर उपचार करणं शक्य होऊन कर्करोगाची प्रगती रोखणं शक्य होते. याव्यतिरिक्त, काही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एचपीव्ही चाचणीचा वापर प्राथमिक तपासणी साधन म्हणून वाढत्या प्रमाणात केला जातोय.

एचपीव्ही चाचणी मुळे रुग्ण आणि डॉक्टर फॉलो-अप केअर सारखे माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात. ज्या महिलांची हाय-रिस्क एचपीव्ही चाचणी निगेटिव्ह येते त्यांच्या बाबतीत अनेकदा तपासणी दरम्यानचे अंतर सुरक्षितपणे वाढवणे शक्य होते, ज्यामुळे अनावश्यक प्रक्रिया आणि चिंता कमी होते.

याउलट, ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह येते त्यांना त्वरित योग्य काळजी मिळू शकते. एचपीव्ही चाचणी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी हे एक प्रभावी साधन आहे. उच्च-जोखीम असलेल्या संसर्गांची लवकर ओळख करून, ते महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करणं शक्य होतं आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT