Heart Test : तुमचं हृदय किती निरोगी आहे? ECG-Echo नाही तर घरच्या घरी 'या' टेस्टद्वारे समजून घ्या हृदयाचं आरोग्य

Heart Test : चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे तुमचं हृदय कमजोर होण्याचा धोका वाढतो. अशावेळी घरच्या घरी हृदयाचं आरोग्य समजून घ्यायचं असेल तर या सोप्या पद्धतींचा करा वापर
Heart Test
Heart Testsaam tv
Published On

चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यामधील एक सतत सतावणारी समस्या म्हणजे हृदयासंबंधीचे आजार. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे तुमचं हृदय कमजोर होण्याचा धोका वाढतो. परिणामी हार्ट अटॅख आणि स्ट्रोक यांच्यासारख्या गंभीर समस्या बळावतात. अशावेळी तुमच्या हृदयाचं आरोग्य जाणून घेण्यासाठी ECG आणि Echo यांसारखे टेस्ट केले जातात.

मात्र जर तुम्हाला या टेस्ट न करता हृदयाचं आरोग्य जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डॉक्टरची मदत न घेता देखील तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याची माहिती जाणून घेऊ शकता.

हृदयाचं आरोग्य जाणून घेण्यासाठी 'या' गोष्टी करा

दररोज ४० जिने चढा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर तुम्ही १.५ मिनिटांच्या आत ४० जिने चढत असाल आणि तुम्हाला धाप लागत नसेल तर समजून जा तुमच्या हृदयाचं आरोग्य अगदी उत्तम आहे. तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेज असतील तर तर तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो.

Heart Test
Heart Valve Disease: हृदयाच्या झडपांचा आजार काय असतो? जाणून घ्या यामागील कारणं काय असतात?

कंबरेचं माप

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधनातमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, जर तुम्हाला तुमच्या हृदयाचं आरोग्य जाणून घ्यायचा असेल तर बीएमआयपेक्षा कंबरेचा माप घेणं फायदेशीर ठरेल. यानुसार पुरुषाच्या कंबरेचा आकार 37 इंच आणि महिलांच्या कंबरेचा आकार 31.5 इंच असणं हे तुमचं हृदय निरोगी नसल्याचं लक्षण आहे.

पल्स रेट तपासा

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, प्लस रेट तपासून तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याची माहिती घेऊ शकता. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, नॉर्मल एक्टिविटीज आणि वयानुसार व्यक्तीचा सामान्य प्लस रेट एका मिनिटात 60 ते 100 बीट्स असावा. जर यापेक्षा रेट वेगळा असेल तर तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोद्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. साम टीव्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Heart Test
Detox Body: तुमच्या शरीरात टॉक्सिन आहे? 'हे' बदल दिसल्यास समजून जा शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आलीये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com