Parenting tips, Post-Pregnancy Diet, Mother diet after delivery, food after delivery for indian mother  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

नव्या बनलेल्या आईसाठी आरोग्यदायी आहार असा असायला हवा

नुकत्याच जन्मलेल्या बाळाची आपण पुरेपुर काळजी घेत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नुकत्याच जन्मलेल्या बाळाची आपण पुरेपुर काळजी घेत असतो. बाळाच्या कपड्यांपासून ते त्याच्या खाण्यापिण्यात कोण कोणत्या आहाराचा समावेश असायला हवा हे आपण पाहातो (Post-Pregnancy Diet)

हे देखील पहा -

बाळाच्या जन्मानंतर जितकी काळजी बाळाची घेतली जाते तितकीच काळजी बाळाच्या आईचीही घ्यायला हवी. आई जे काही खाते ते तिच्या बाळाला मिळत असते. प्रसूतीदरम्यान स्त्रीची हाडे कमकूवत होतात त्यासाठी नव्या बनलेल्या आईला तिच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. अशावेळी कोणते पदार्थ खायला हवे हे जाणून घेऊया. (food after delivery for indian mother)

१. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. नव्या आईसाठी हे फायदेशीर ठरते. आपण उकडलेले अंडे, अंड्याची भुर्जी किंवा आम्लेट करून खाऊ शकता.

२. हळदीमध्ये जीवनसत्त्व ब असल्यामुळे ते आपल्या शरीरातील घाव भरण्यासाठी सहाय्यक ठरते. म्हणून प्रसुतीनंतर घाव भरण्यासाठी आणि हळदीचे (Turmeric) सेवन करावे त्यात क जीवनसत्त्व, पोटॅशियम आढळते. झोपताना एक ग्लास हळदयुक्त दुधाचं (Milk) सेवन करायला हवे.

३. प्रसूतीनंतर ओव्याचं सेवन पोटासंबंधी आजारांना बरे करण्यासाठी नव्या आईसाठी अतिशय गुणकारी ठरते. दररोज रात्री गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून ओवा रक्षण करतो. ओव्यामध्ये अँटीबॅक्टेरिअल, वि अँटीऑक्सिडंट्स, अँटीफंगल, अँटीसेप्टीक गुण आहेत. दररोज एक चिमूट ओवा कोमट पाण्याबरोबर खा.

४. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व आणि खनिजे आहेत. मेथी सांधेदुखी आणि पाठदुखीपासून आराम देते. आपण आहारात मेथ्यांचा वापर करू शकतो किंवा मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी गाळून ते पाणी प्या.

५. रोजच्या आहारात डाळींचा समावेश करा त्याचबरोबर राजमा आणि ब्लॅक बीन्स यांचा समावेश अवश्य करा. यामध्ये प्रथिनं, फायबर्स, जीवनसत्त्व, इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हा उत्तम आहार आहे. डाळींच्या सेवनाने ऊर्जा मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT