Signs Of Heart Failure saam tv
लाईफस्टाईल

Signs Of Heart Failure: मानेची ही एक टेस्ट सांगेल हार्ट अटॅक येणारे; अवघ्या २० मिनिटात कळेल धोका किती?

Neck test heart health check: हृदयविकार हा आजच्या काळातील सर्वात मोठा आरोग्याचा धोका मानला जातो. डॉक्टरांच्या मते, आता एक सोपी ‘नेक टेस्ट’ करून फक्त २० मिनिटांत हृदयविकाराचा धोका किती आहे हे समजून घेता येते.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाच्या आजाराचे सुरुवातीचे संकेत अनेकदा दुर्लक्षित केले जातात. कारण त्याची लक्षणं थकवा किंवा वाढत्या वयातील सामान्य बदलांसारखी वाटतात. पण एका नव्या अभ्यासानुसार, फक्त एक साधं मानेचं स्कॅनिंग करून पुरुषांमध्ये हार्ट फेल्युअरचा सुरुवातीचा धोका ओळखता येऊ शकतो.

वैद्यकीय भाषेत या तपासणीला कॅरोटिड अल्ट्रासाऊंड म्हणतात. हेच ते तंत्रज्ञान आहे जे गर्भावस्थेत अल्ट्रासाऊंडसाठी वापरण्यात येतं. संशोधकांचं म्हणणं आहे की, डॉक्टर 60 वर्षांवरील पुरुषांना ही तपासणी करण्याचा सल्ला देऊ शकतात.

या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक डॉ. एटिन्यूक अकिनमोलायन (UCL) यांनी सांगितलं की, “कॅरोटिड अल्ट्रासाऊंड सुरक्षित, स्वस्त आणि पूर्णपणे वेदनारहित तपासणी आहे. आमचे निष्कर्ष दाखवतात की, ही तपासणी हार्ट फेल्युअरचे सुरुवातीचे संकेत देऊ शकते.”

त्यांनी सांगितलं की, जर एखाद्या रुग्णाच्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये धोका दिसला, तर ते वेळेत डॉक्टरांशी जीवनशैलीत बदल करण्याबाबत चर्चा करू शकतात. ज्यामुळे भविष्यात हार्ट फेल्युअरचा धोका कमी होऊ शकतो. ही तपासणी 15 ते 30 मिनिटांत होते.

कशी केली जाते ही तपासणी?

यात व्यक्तीच्या मानेवर एक छोटा हँडहेल्ड डिव्हाइस फिरवून कॅरोटिड धमन्यांची लवचिकता तपासली जाते. ह्याच धमन्या मेंदू, चेहरा आणि गर्दनपर्यंत रक्त पोहोचवतात.

वाढतं हृदयविकाराचं प्रमाण

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या माहितीनुसार, UK मध्ये सुमारे 9.2 लाख लोक हार्ट फेल्युअरसोबत जगतात. शरीरातील मोठ्या धमन्या सामान्यतः लवचिक असतात पण वय आणि काही आजारांमुळे त्या कठीण होऊ लागतात. यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर ताण येतो आणि हृदय कमजोर होऊ लागतं. मुख्य म्हणजे यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

अभ्यासातून तज्ज्ञांना काय दिसून आलं?

UCLच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभ्यासात 1,631 पुरुष (71 ते 92 वर्षे वयोगटातील) सहभागी झाले. यासाठी डेटा ब्रिटिश रिजनल हार्ट स्टडीमधून घेतला गेला, ज्याची सुरुवात 1970 मध्ये झाली होती. निष्कर्षांमध्ये असं दिसलं की, ज्यांच्या कॅरोटिड धमन्या सर्वात कमी लवचिक होत्या त्यांच्यात हार्ट फेल्युअरचा धोका 2.5 पट जास्त होता.

या संपूर्ण अभ्यासाचा निष्कर्ष असा निघाला की, ज्यांच्या कॅरोटिड धमन्या जास्त जाड होत्या, त्यांच्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप जास्त होता. प्रत्येक 0.16 मिमी जाडी वाढल्यावर हार्ट अटॅकचा धोका सुमारे 29 टक्क्यांनी वाढतो.

BHFचे चीफ मेडिकल ऑफिसर प्रोफेसर ब्रायन विल्यम्स यांनी सांगितलं की, हे स्पष्ट संकेत आहेत की, ज्यावेळी कॅरोटिड धमन्या कठीण होतात तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. अशा कोणत्याही बदलाला गंभीरतेने घ्यायला हवे.

UCLच्या आणखी एका अभ्यासात सांगितलंय की, फक्त 10 मिनिटांच्या स्कॅनिंगमधून लाखो रुग्णांमध्ये नियंत्रणात न येणाऱ्या उच्च रक्तदाबाचं कारण शोधता येतं. ही तपासणी अशा रुग्णांसाठी आहे ज्यांच्या अॅड्रिनल ग्लँड्स जास्त प्रमाणात एल्डोस्टेरोन नावाचा हार्मोन तयार करतात. यामुळे शरीरातील मीठाचं प्रमाण बिघडतं आणि रक्तदाब खूप वाढतो. उच्च रक्तदाब असलेल्या प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीत ही समस्या आढळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blackhead Remover: नाकावर खूप ब्लॅकहेड्स झालेत? घरातल्या या सामग्रीने मिळेल क्लिन ग्लोईंग फेस

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

बिबट्यांच्या वाढत्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितला अचूक उपाय, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

मतदानाच्या दिवशी मोठा राडा; रायगडमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

SCROLL FOR NEXT