Long Shower Risks: दररोज जास्त वेळ आंघोळ करताय? थांबा! तुमच्या त्वचेला होऊ शकतो गंभीर धोका

Dhanshri Shintre

बराच वेळ आंघोळ

सध्याच्या उन्हाळ्यात सगळेजण दिवसातून अनेकवेळा आणि बराच वेळ आंघोळ करतात.

अत्यंत हानिकारक

शॉवरखाली उभे राहिल्यावर थंड पाण्यामुळे आराम मिळत असला, तरी जास्त वेळ आंघोळ करणे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते, याबाबत अनेकांना माहिती नसते.

दुष्परिणाम

चला तर मग जाणून घेऊया अतिआंघोळीमुळे त्वचेवर काय दुष्परिणाम होतात.

त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते

दीर्घकाळ आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा कमी होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात. डॉक्टरांचा सल्ला आवश्यक ठरतो.

खाज सुटण्याची समस्या वाढते

जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचेचा संरक्षणात्मक थर कमकुवत होतो, त्यामुळे खाज, जळजळ आणि इतर त्वचासंबंधी त्रास अधिक वाढू शकतो.

सुरकुत्या वाढण्याचा धोका

पाण्यात जास्त वेळ राहिल्यास त्वचा मऊ होते आणि विशेषतः पायांवर सुरकुत्या निर्माण होतात, ज्यामुळे त्वचा सैल आणि नाजूक वाटू लागते.

संसर्गाचा धोका वाढतो

वारंवार आणि जास्त आंघोळीमुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कमी होते, ज्यामुळे बॅक्टेरिया व फंगल संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि त्वचेसंबंधी त्रास होतो.

आंघोळीचा कालावधी

आंघोळीचा कालावधी १०-१५ मिनिटांपेक्षा अधिक नसावा. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करा आणि गरम पाण्याचा अधिक वापर टाळा.

मॉईश्चरायझर लावणे

आंघोळीनंतर त्वचेला योग्य पोषण मिळावे यासाठी मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे. संवेदनशील त्वचेसाठी सौम्य किंवा कमी प्रमाणात साबण वापरावा.

NEXT: चमच्याची सुरुवात कधी आणि कशी झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

येथे क्लिक करा