Dhanshri Shintre
हाताने खाणे ही भारतात आणि इतर अनेक संस्कृतींमध्ये प्राचीन परंपरा मानली जाते.
पण ही परंपरा केवळ धार्मिक व सांस्कृतिक नाही, तर आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसारही आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
शरीर आणि अन्नामधील थेट स्पर्शामुळे जठराग्नी (भूक) उत्तेजित होतो.
शरीर अन्नाच्या तापमानाशी समायोजित होते आणि खाण्याच्या प्रक्रियेशी मानसिक जोड तयार होते.
तरीही, गेल्या काही दशकांपासून भारतासह जगभरात चमच्याने खाण्याची पद्धत वाढत आहे.
या पद्धतीची सुरुवात नेमकी केव्हा झाली, हे पाहणे रंजक आहे.
सुमारे ३,००० वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये हँडल असलेले चमचे वापरले जात होते.
सुरुवातीला दगडाचे चमचे आणि नंतर लाकडी चमचे बनवले जात होते.
धातूचे चमचे नंतरच्या काळात लोकप्रिय झाले.
ग्रीक आणि रोमन साम्राज्यांच्या काळात, चमचे कांस्य आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये बनवले जात आणि त्यांचा वापर प्रामुख्याने श्रीमंत लोक करत.
इंग्रजच्या इतिहासात चमच्याचा पहिला उल्लेख १२५९ मध्ये एडवर्ड पहिला याच्याबाबत आढळतो.