First Sign of Cancer in Children saam tv
लाईफस्टाईल

Cancer In Children: लहान मुलांमध्ये कॅन्सरपूर्वी शरीराच्या 'या' भागात दिसतं पहिलं लक्षण, पालकांनी बदलांकडे लक्ष द्यावं

Cancer In Children Symptoms: मुलांमध्ये कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल बोललो तर शरीराच्या काही भागात असामान्य सूज येणं हे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लाईफस्टाईल म्हणजेच जीवनशैली संबंधीत अनेक आजारांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. यावेळी लहान मुलांमध्येही हे आजार पाहायला मिळतात. यातीलच एक आजार म्हणजे कॅन्सर. जर आपण मुलांमध्ये कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये शरीराच्या काही भागात असामान्य सूज येणं हे पहिले लक्षण असू शकते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर ही सूज सतत वाढत असेल तर ती चिंतेची बाब असू शकते. साधारणपणे ही सूज चेहरा, ओटीपोटात, बगल किंवा घशावर दिसू शकते. याव्यतिरिक्त, काही प्रकरणांमध्ये, मुलांचे लिम्फ नोड्स देखील सूजतात. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

लहान मुलांमध्ये कॅन्सरची काय लक्षणं दिसून येतात?

  • मुलांची वाढ अचानक थांबणं.

  • शरीराच्या कोणत्याही भागात असामान्य सूज येणं.

  • चेहरा, ओटीपोट, बगल किंवा घशात गाठ तयार होणं.

  • अॅनिमिया आणि सतत अशक्तपणा जाणवणं.

  • मुलाला भूक न लागणं आणि तो चिडचिडा होतो.

  • लिम्फोमा कॅन्सरमध्ये सतत ताप येतो.

  • वेगाने वजन कमी होणं

मुलांमध्ये कॅन्सरची ही लक्षणं लवकर ओळखून त्यावर योग्य वेळी उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कोणतीही असामान्य सूज, अशक्तपणा, ताप किंवा वजन कमी झाल्याचं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. यावेळी वेळीच निदान करून योग्य उपचार करून कॅन्सरवर मात करता येऊ शकते. पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि कोणतीही लक्षण इग्नोर करू नयेत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT