Bathroom Hygiene google
लाईफस्टाईल

Bathroom Hygiene: बाथरूममध्ये या १० वस्तू ठेवूच नका, अन्यथा...

Home Cleanliness: बाथरूममधील ओलावा आणि जंतूंमुळे काही वस्तू ठेवल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या 10 वस्तू बाथरूममध्ये ठेवू नयेत.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकालाच आपलं घर स्वच्छ सुंदर पाहायला आवडतं. विशेषत: गृहीणींना घर स्वच्छ आणि निटनेटकं पाहायला आवडतं. पण घरातले असे काही कोपरे किंवा जागा असतात. जिथे ठेवलेल्या वस्तू हरवून जातात किंवा सापडतच नाहीत. अशी एक जागा म्हणजे तुमचे Bathroom आहे. अनेकांना अंघोळीला जाताना बाथरुममध्ये अनेक गोष्टी सोबत घेऊन जाण्याची सवय असते. पण यामुळे तिथले जंतू तुमच्या वस्तूंवर बसतात. जे तुम्ही दिवसभर वापरता.

पुढे आपण कोणत्या गोष्टी बाथरुममध्ये ठेवू नये? याबद्दल जाणून घेणार आहोत. बाथरूममध्ये ओलावा, उष्णता आणि जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे काही वस्तू इथे ठेवणं आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी हानिकारक ठरू शकतं. जाणून घ्या कोणत्या 10 वस्तू बाथरूममध्ये ठेवू नयेत?

मेकअप

बाथरूममधील आर्द्रतेमुळे मेकअप लवकर खराब होतो. बॅक्टेरिया वाढून त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

औषधे आणि सप्लिमेंट्स

उष्णता व ओलाव्यामुळे औषधांची पॉवर कमी होऊ शकते. औषधं खराब होण्याचा धोकाही वाढतो.

पुस्तके आणि मासिके

बाथरूममधील वास आणि ओलावा कागद शोषून घेतो. पानं वाकडी होतात आणि दुर्गंधी येऊ शकते.

नॉन-वॉटरप्रूफ इलेक्ट्रॉनिक वस्तू

नॉन-वॉटरप्रूफ इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्याच्या संपर्कात आल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकतो. यामुळे विजेचा धक्का लागण्याचा गंभीर धोका असतो.

खूप रेझर्स

ओलाव्यामुळे रेझरवर गंज चढतो. ब्लेड बोथट होऊन त्वचेला इजा होऊ शकते.

दागिने

उष्णता आणि ओलावा दागिन्यांची चमक कमी होते. केमिकल्समुळे रंग बदलण्याची शक्यता असते.

टॉवेल

सतत ओलाव्यामुळे टॉवेलला कुबट वास येतो. जंतुसंसर्ग वाढण्याचा धोका असतो. म्हणून तो वापरल्यावर उन्हात ठेवावा.

पेपरचे प्रोडक्ट्स

बाथरुममध्ये एक्सट्रा टॉयलेट पेपर ठेवू नये. कारण हे तिथल्या आर्द्रतेमुळे कागद खराब होतो. स्प्रे किंवा केमिकल्स आपण तिथे वापरतो. त्यामुळे ते स्वच्छ राहत नाहीत.

फोटो फ्रेम

ओलाव्यामुळे फोटो फ्रेमच्या काचेला चिकटतात. त्यामुळे तुमच्या पैशांच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

नेल पॉलिश

बाथरुममधल्या तापमान बदलामुळे नेल पॉलिश घट्ट किंवा खराब होते. वापरण्यायोग्य राहत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाला काही तास शिल्लक..., माजी महापौरांसह 54 बड्या नेत्यांची हकालपट्टी, भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना झटका! मकरसंक्रांतीला जानेवारीचे ₹१५०० मिळणार नाहीत; वाचा अपडेट

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात सभा

Crime News : गुप्त माहिती मिळवली, खासदाराला ब्लॅकमेल करून ५ लाखांची खंडणी मागितली; बोगस आयटी कर्मचाऱ्याला अटक

Saree Designs: पैठणी की खण साडी? हळदी-कुंकू समारंभासाठी कोणता लूक तुमच्यावर उठून दिसेल? पाहा हे 5 लेटेस्ट साडी पॅटर्न

SCROLL FOR NEXT