Leg symptoms of heart problems saam tv
लाईफस्टाईल

Heart disease symptoms: हृदयाच्या गंभीर समस्या असल्यास पायांमध्ये दिसतात 'हे' तीन बदल; हार्ट अटॅक येण्यापूर्वी उपचार घ्या

Leg symptoms of heart problems: शरीरातील प्रत्येक अवयव एकमेकांशी जोडलेला असतो. अनेकदा शरीरातील गंभीर आजारांची लक्षणे दूरच्या अवयवांवर दिसतात. अशाच प्रकारे, हृदयाच्या गंभीर समस्यांची (Serious Heart Problems) काही लक्षणे पायांमध्ये दिसू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपलं शरीर आपल्याला प्रत्येक आजाराचं काही ना काही संकेत देत असतं. कधी कधी काही आजारांची लक्षणं शरीराच्या अगदी वेगळ्या भागात दिसून येतात. त्याकडे आपण साधं दुखणं म्हणून दुर्लक्ष करतो. पण योग्य वेळी ही लक्षणं ओळखली तर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या धोकादायक परिस्थिती टाळता येऊ शकते.

आपलं हृदय हे शरीरातील सर्वांत महत्त्वाचं अवयवांपैकी एक आहे. मानवी हृदय सतत रक्त पंप करून शरीराच्या प्रत्येक भागाला पोषण आणि ऊर्जा पुरवतं. शरीराच्या कोणत्याही भागाला योग्य प्रमाणात रक्त न मिळाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. यापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपले पाय.

पायांमध्ये होणारे बदल बहुतेक वेळा आपण दुर्लक्षित करतो. पण हे बदल मोठ्या आरोग्य समस्यांचे संकेत ठरू शकतात. जर पायांमध्ये काही वेगळं जाणवलं तर ते गंभीर आजाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार हे जगभरात गंभीर आजार आणि मृत्यूचं प्रमुख कारण आहेत. त्यामुळे पायांवरील साध्या-साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे.

हृदयविकार पायांवर कसा दिसून येतो?

हृदयविकार म्हटलं की, आपल्याला बहुतेक वेळा छातीत दुखणारा व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो. पण हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार जसं की, हृदय नीट रक्त पंप करू शकत नाही किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होतात यांची चिन्हं शरीराच्या इतर भागात देखील दिसून येतात.

अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मॅटॉलॉजीनुसार, पाय आणि बोटांवर दिसणारी तीन विशिष्ट बदल ही हृदयाशी संबंधित त्रासाची लक्षणं ठरू शकतात.

पायाच्या बोटांवर वेदनादायक गाठी (Osler Nodes)

पायाच्या किंवा हाताच्या बोटांवर दिसणाऱ्या छोट्या पण वेदनादायक गाठींना ऑस्लर नोड्स म्हटलं जातं. या गाठी इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस नावाच्या हृदयाच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. या संसर्गाचा परिणाम हृदयाच्या आतील आवरणावर आणि झडपांवर होतो. गाठी काही दिवसांत नाहीशा होतात, पण मूळ आजार बरा करण्यासाठी अँटिबायोटिक्स किंवा कधी कधी शस्त्रक्रिया करावी लागते.

पाय सुजणे

पाय सुजणं ही हृदय नीट कार्य करत नसल्याची महत्त्वाची खूण आहे. हृदय रक्त नीट पंप करू शकलं नाही तर शरीरात द्रव साचू लागतो आणि तो पाय, टाच आणि पोटऱ्यांमध्ये साठतो. त्यामुळे पायांना सूज येऊ लागते.

पायांची बोटं निळसर होणं

जर पायांची बोटं वारंवार निळसर दिसू लागली तर हे ऑक्सिजनयुक्त रक्त योग्य प्रमाणात त्या भागाला मिळत नसल्याचं लक्षण असतं. हृदय हे ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरभर पोहोचवतं. त्यामुळे निळसरपणा हा हृदय किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित गंभीर अडचणीचा संकेत असू शकतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने आणि गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain : ढगफुटी सदृश्य पावसाने होत्याचे नव्हते केले; शेताला तलावाचे स्वरूप, दोन एकर सोयाबीनची गंज पाण्याखाली

सुनेला अंधार खोलीत डांबून ठेवलं, नंतर साप सोडला; महिला ओरडत राहिली पण.. सासरच्यांकडून छळ

Sayali Sanjeev: नाकात नथनी कानात झुमका केसामधी गजरा; मराठमोळी नेसून साडी भारी तुझा नखरा...

ChatGPT Lottery: ChatGPT वरून महिलेने जिंकली लॉटरी, कोट्यवधी रूपयांचे काय केलं, वाचून धक्का बसेल

SCROLL FOR NEXT