Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नानंतर महिलांच्या मंगळसूत्र या दागिन्याला विशेष महत्व आहे. मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. आजकाल बाजारात मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहे. पारंपारिक आणि आधुनिक डिझाईन्सचे मंगळसूत्राचे अनेक पॅटर्न्स आहेत.
काळे मनी मंगळसूत्र हे महिलांसाठी पारंपारिक दागिना आहे. फार पूर्वीपासून महिला सोन्याच्या चैनमध्ये काळे मणी गुंफलेले मंगळसूत्र घालतात.
मंगळसूत्राला दोन वाटी असतात. या वाट्यांच्या बाजूला सोन्याच्या चैनमध्ये काळे मनी गुंफलेले असतात.
काळ्या मण्यांच्या दोन पदरी माळेत मध्यभागी कोल्हापुरी साजाची पाने किंवा एखादे मोठे 'पेंडंट' असते ज्याला कोल्हापुरी साज मंगळसूत्र असे म्हटले जाते.
डेली वेअरसाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी नाजूक आणि हलके मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता ज्याला नाजूक सोनसलाई मंगळसूत्र असे म्हणतात हे युनिक पॅटर्न आहे.
काळेमणी आणि यात सोन्याचे मणी असे तारेमधून गुंफून मंगळसूत्र बनवले जाते ज्याला जवमणी मंगळसूत्र असे म्हणतात.