Manasvi Choudhary
साडी साधी असली तरी तिच्यावर तुम्ही स्टायलिश ब्लाऊज घालू लूक सुंदर करू शकता.
साध्या साडीवर तुम्ही कोणत्या डिझाईन्सचे ब्लाऊज घालू शकता हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वर्क केलेला ब्लाऊज तुम्ही प्लेन साडीवर घालू शकता. जरी काम, मिरर वर्क , लेस असलेला ब्लाऊज तुम्ही प्लेन साडीवर निवडा.
साध्या कॉटन किंवा शिफॉन साडीवर तुम्ही फ्लोरल प्रिंटेड ब्लाउज घाला. साडीच्या कॉन्स्ट्रास्ट ब्लाऊज कलर तुम्ही निवडा.
तुम्हाला जर ऑफिसलूकसाठी ब्लाऊज निवडायचा असेल तर तुम्ही कॉलर नेक ब्लाऊज निवडा जो प्लेन साडीवर उठून दिसतो.
साध्या साडीवर कोपरापर्यंत बाह्या असलेला आणि पाठीवर 'डीप नेक' असलेला ब्लाउज खूप सुंदर दिसतो.
साडीच्या रंगापेक्षा पूर्णपणे वेगळ्या रंगाचा ब्लाउज प्लेन साडीवर उठून दिसतो.